जळगाव : मंगळग्रह देवस्थानसाठी २५ कोटी; शिखर समिती बैठकीत प्रस्ताव मंजूर

राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी
श्री मंगळ देव मंदिर, अमळनेर
श्री मंगळ देव मंदिर, अमळनेर pudhari news network
Published on
Updated on

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.24) झालेल्या शिखर समिती बैठकीत अमळनेर (जि. जळगाव) येथील देशातील एकमेवाद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या २५ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. अमळनेरचे श्री मंगळ देव मंदिर हे संपूर्ण भारतातील मंदिरांपैकी सर्वात प्राचीन, सर्वात दुर्मिळ असे एक मंदिर आहे.

Summary

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना मंगळवार (दि.२४) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

श्री मंगळ देव मंदिर, अमळनेर
CM Eknath Shinde | स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी 40 कोटींचा निधी

राज्यातील तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. या सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गूणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी या बैठकीत दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार सरोज अहिरे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा हे दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news