Aditi Tatkare Jalgaon news : ‘लाडकी बहीण’ बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे आज पुळका दाखवत आहेत; तटकरेंचा विरोधकांवर थेट हल्ला

शरद पवारांबद्दल आदर कायम; राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या बातम्यांवर पसरवला जातोय संभ्रम
Aditi Tatkare
Aditi TatkarePudhari
Published on
Updated on

​जळगाव : "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करताना 'ही योजना आणूच नका, शासनाचे नुकसान होईल' असा सूर लावत थेट उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्यांना आज अचानक लाडक्या बहिणींचा पुळका आला आहे," अशा रोखठोक शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. २४ तारखेच्या रात्री जळगाव मुक्कामी आलेल्या आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांच्या दुटप्पीपणावर जोरदार निशाणा साधला.

Aditi Tatkare
Jalgaon Theft News | जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; भडगाव, भुसावळात लाखोंचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता थकला नाही

विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला आपण अजिबात गांभीर्याने घेत नाही, असे स्पष्ट करत मंत्री तटकरे म्हणाल्या, "जेव्हा सरकार एखादे चांगले काम करते, तेव्हा टीका होणारच. महायुती सरकारचे धोरण योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना निरंतर सुरूच राहील. लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता चुकलेला नाही; तांत्रिक कारणामुळे एखाद्या महिन्याचा हप्ता लांबला असल्यास पुढील महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत." महिलांना सक्षम करण्यासाठी 'लखपती दीदी'सह महिला शेतकऱ्यांसाठी विशेष धोरण आणल्याचेही त्यांनी नमूद केले.

Aditi Tatkare
Jalgaon News | कुऱ्हा-जामनेर मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे अपघातांचा धोका वाढला

शरद पवारांचा फोटो वापरण्याकडे नकारात्मकतेने पाहू नका

जळगाव जिल्हाध्यक्षांनी शरद पवार यांचा फोटो वापरल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या, "शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. देशाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या मनात आजही आदराची भावना आहे. याच भावनेतून एखाद्या कार्यकर्त्याने त्यांचा फोटो वापरला असेल, तर त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही."

Aditi Tatkare
Jalgaon News | सोन्याच्या भावाच्या जमिनी कवडीमोल लाटल्या; आता कारखान्याची विक्री करून कोट्यवधींचा मलिदा लाटण्याचा डाव! शेतकऱ्यांचा आरोप

विलीनीकरणाच्या अफवा आणि खोटे नॅरेटिव्ह

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? या प्रश्नावर, "आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून यावर वरिष्ठ नेतेच भाष्य करतील," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विलीनीकरणाला विरोध असल्याच्या बातम्यांवर बोलताना, "आमच्या नेत्यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. खोटे नॅरेटिव्ह पसरवून संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न बंद झाले पाहिजेत," असा इशारा त्यांनी दिला.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर मुक्ताईचरणी लीन! मंत्री आदिती तटकरेंनी घेतले कोथळीत संत मुक्ताईचे दर्शन

‘राज्यातील जनता सुखी, समाधानी राहो’; आदिशक्तीच्या चरणी घातले साकडे

जळगाव : आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे पोहोचून आदिशक्ती संत मुक्ताईचे भावपूर्ण दर्शन घेतले. या पावन प्रसंगी मुक्ताईच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील सर्व जनता सुखी, समाधानी व आरोग्याने संपन्न राहो, असे साकडे घातले.

राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, मंत्री आदिती तटकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील प्राचीन संत मुक्ताई मंदिरात हजेरी लावली. मंदिरात विधीवत पूजा-अर्चा करून त्यांनी आदिशक्तीचे दर्शन घेतले.

हे माझे परमभाग्य: आदिती तटकरे

दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आषाढी एकादशीच्या या अत्यंत पवित्र दिवशी आदिशक्ती संत मुक्ताईच्या भूमीत येऊन दर्शन मिळणे, हे माझे परमभाग्य आहे. मुक्ताईच्या आशीर्वादाने राज्यातील जनता सुखी-समाधानी राहो आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहो, हीच प्रार्थना मी आज मुक्ताईचरणी केली आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news