Jalgaon News | कुऱ्हा-जामनेर मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे अपघातांचा धोका वाढला

वन विभागाच्या हद्दीतील मार्गावर रात्रीच्या वेळी अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?
 Kurha Jamner Road
सावळ–जामनेर दरम्यान कुऱ्हा मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी रस्ता धोकादायक ठरत आहे Pudhari
Published on
Updated on

Kurha Jamner Road

जळगाव : भुसावळ–जामनेर दरम्यान कुऱ्हा मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी हा रस्ता दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत आहे. सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम संथ गतीने आणि आवश्यक सुरक्षितता उपायांशिवाय सुरू असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वन विभागाच्या हद्दीतील या मार्गावर रात्रीच्या वेळी अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सिमेंट आणि मातीचा मेळ; वाहनचालक गोंधळात

या मार्गावर सध्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कामातील निष्काळजीपणामुळे मुख्य सिमेंट रस्ता आणि बाजूच्या मातीच्या पट्ट्यातील स्पष्ट फरकच राहिलेला नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचल्याने वाहनचालकांना नेमका रस्ता ओळखणे कठीण होत आहे. ओव्हरटेक करताना किंवा समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना माती आणि धुळीमुळे वाहने घसरण्याच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

 Kurha Jamner Road
Jalgaon News | सोन्याच्या भावाच्या जमिनी कवडीमोल लाटल्या; आता कारखान्याची विक्री करून कोट्यवधींचा मलिदा लाटण्याचा डाव! शेतकऱ्यांचा आरोप

रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक

कामाची जबाबदारी असलेल्या ठेकेदार बी. एन. अग्रवाल यांच्याकडून पुरेशा सुरक्षाव्यवस्था करण्यात आल्याचे दिसत नाही. केवळ काही ठिकाणी नावापुरते डायव्हर्शन फलक लावण्यात आले असून अनेक ठिकाणी कोणतीही सूचना किंवा इशारा देण्यात आलेला नाही. अपूर्ण राहिलेल्या बाजूच्या रस्त्यावर भराव टाकण्यात आलेला नसल्याने अंधारात वाहन थेट खड्ड्यात किंवा रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे.

चारचाकी आणि दुचाकीधारकांची कसरत

सध्याच्या स्थितीत रस्त्याची रुंदी कमी झाल्याने एकावेळी केवळ एकच मोठे वाहन जाऊ शकते. परिणामी, समोरून वाहन आल्यास कार आणि दुचाकीचालकांना आपली वाहने सिमेंट रस्त्यावरून खाली मातीच्या भागात उतरवून दुसऱ्या वाहनाला मार्ग द्यावा लागत आहे. त्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता कायम आहे.

 Kurha Jamner Road
Jalgaon sand mafia news: लिलाव फ्लॉप, माफिया टॉप! वैध वाळू विक्रीतून जेमतेम ४ कोटी, तर दंडात्मक कारवाईतून तब्बल ९ कोटींची वसुली; जळगावात वाळू माफियांची चांदी

सार्वजनिक बांधकाम विभागाचे नेहमीचे आश्वासन

या गंभीर परिस्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भुसावळ कार्यालयातील अधिकारी तायडे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित काम एचएएम (HAM) योजनेअंतर्गत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, "त्या ठिकाणी आमचे सुपरवायझर कार्यरत आहेत. अपघात टाळण्यासाठी संबंधित ठेकेदाराला तातडीने सूचना फलक व साईन बोर्ड लावण्याचे निर्देश देण्यात येतील," असे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावर सुरक्षेच्या उपाययोजना अद्यापही अपुऱ्या असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news