जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अवैध्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरवर शुक्रवारी (दि.२२) यावल तालुका आरोग्य विभागाने कारवाई केली. त्यानंतर त्याला अटक करीत यावल पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल येथील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलनामध्ये कोलकत्ता येथील बिजनकुमार निमलचंद राय (सध्या रा. यावल) हा बोगस डॉक्टर अवैध्यरित्या व्यवसाय करीत होता. याबाबतची तक्रार यावल तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमेश पाचपोळ यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर यावल तालुक्याचे आरोग्य विभागाचे पदाधिकारी, यावल तालुका मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी व पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बोगस डॉक्टरला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी डॉ रमेश पाचपोळे, डॉ धीरज पाटील, डॉ तुषार फेगडे , डॉ गणेश रावते ,डॉ मनोज वारके, डॉ. दाऊद खान , डॉ ईमरान शेख, डॉ. कुंदन फेगडे , डॉ सतिष अस्वार हे उपस्थित होते.
हेही वाचा :