फळं खाताना केलेल्या या चुका बेतू शकतात जीवावर 

फळं खाताना केलेल्या या चुका बेतू शकतात जीवावर 
पुढारी ऑनलाईन :  फळं खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. फळं खाणं हा सतत मिळणारा एनर्जी स्त्रोत आहे. शरीरवाढीला सहायकही असे अनेक घटक फळात असतात. दररोज एकतरी फळ खाल्लं जावं असा सल्लाही डॉक्टर देत असतात. पण कोणते फळ कधी खावे, कोणत्या वेळी खावे किंवा कसे खावे याचेही काही नियम असतात. फळं खाताना केलेल्या केलेल्या चुका कालांतराने जीवावर बेतू शकतात.
ऋतूमान लक्षात घेणे गरजेचे :  ऋतुमान हा व्यक्तीच्या आहारात खूप महत्त्वाचा रोल निभावते. आपल्या पूर्वजांनी त्यामुळेच आहाराच्या अनेक पद्धती आणि नियम घालून दिले आहेत. त्यातीलच महत्त्वाचा नियम आहे ऋतूमानानुसार फळे खाणं.  अनैसर्गिकरित्या पिकवलेली फळं आरोग्यास हानिकारक असतात.  कारण ही फळं आरोग्यासाठी हानिकारक अशी रसायनं घालून पिकवली जातात.
जेवणासोबत फळे खाणं टाळा :  अनेकांना जेवणयासोबत फळे खाण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिजवलेल्या अन्नासोबत कच्ची फळे खाणे पचनशक्तिवर परिणाम करणारे ठरू शकते.
अनेकांना रात्री जेवल्यानंतर फळे खाण्याची सवय असते. रात्री फळे खाल्ल्याने अॅसिडिटी होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. त्यामुळे रात्री फळे खाणं टाळाव.
फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण कच्च्या फळांपेक्षा तुलनेने जास्त असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने फळं खाण्यास प्राधान्य द्यावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news