जळगाव, पुढारी वृत्तसेवा : खानापुर-बुरहानपुर-अंकलेश्वर महामार्गावर बऱ्हाणपूर येथील मॅक्रो व्हिजन स्कुल बस व अँपेरिक्षाचा खानापूर उड्डाण पुलाजवळ अपघात झाला. या अपघातात रिक्षातील दोन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत रावेर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
आज दुपारी 2.30 च्या सुमारास अभोडा येथील सायबु बाबु तडवी (वय ३०) हे मुलगी महेक (वय २) हिला अँपेरिक्षा क्र.एमएच १९,६८२४ ने रावेरच्या दिशेने येत होते. त्यावेळी बऱ्हाणपूर येथून येणाऱ्या मॅक्रोव्हिजन स्कुल बसने धडक दिली. या अपघातात महेक हीचा मृत्यू झाला. तर सायबु यांच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर जखमी सायबु यांना उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान स्कूल बस व रिक्षाच्या अपघाताची माहीती मिळताच राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, पंचायत समिती सदस्य पी.के. महाजन यांच्या सह नागरीकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. गरिब असलेल्या परीवारावर अपघाताच्या माध्यमातुन संकट कोसळले आहे.
हे ही वाचलं का