जळगाव : धरणगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
धरणगाव तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल दोन घरे फोडल्याची घटना सोमवारी, दि. 7 सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्री खुर्द येथील जुना चिकूचा मळा, पिंप्री खुर्द येथे राहत असलेल्या लोटू मुरलीधर पाटील (७३) वैद्यकिय उपचारासाठी बाहेगावी गेले होते. या संधीचा फयदा साधत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी साडेपाच तोळे सोने चांदीच्या दागिन्यांसह ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच त्यांच्या घराच्या शेजारी असलेले संदिप किसन खंडू शिंदे (३८) हे देखील खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शिंदे यांच्या घरातील चोरीच्या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, सहायक फौजदार राजेंद्र कोळी, मोती पवार, समाधान भागवत, पोलीस हेड कॉन्स्टेबल करीम सय्यद, कैलास पाटील, समाधान भागवत आदींसह श्वान पथकासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने चोरीप्रकरणी चौकशी केली असता ठसेतज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
हेही वाचा:
- अब्दुल सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंवर अभद्र भाषेत टीका, शब्द मागे घेण्यासाठी दिला २४ तासांचा अल्टिमेटम
- पुणे : काठिण्य पातळीमुळे फुटला घाम; विद्यापीठाच्या 'पेट'साठी 72 टक्के विद्यार्थ्यांनी लावली हजेरी
- Bipasha Basu Pregnant : प्रेग्नन्सीत बिपाशा डान्स करते तेव्हा…; नेटकऱ्यांकडून पुन्हा ट्रोल (Video)

