जळगाव : पतीनेच केले पत्नीचे अश्लील छायाचित्र व्हायरल, घरातून लावले हाकलून

जळगाव : पतीनेच केले पत्नीचे अश्लील छायाचित्र व्हायरल, घरातून लावले हाकलून
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात पतीनेच पत्नीचे अश्लील छायाचित्र व्हायरल केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयिताने पत्नीस अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर पत्नीचे अश्लील छायाचित्र काढले. विवाहितेने त्यास विरोध केल्यानंतर तिला घरातून बाहेर काढण्याची धमकीही दिली. विवाहितेला माहेरी घेण्यासाठी आलेल्या नातेवाइकांसमोर सासरच्या मंडळींनी भांडण करून विवाहितेला घरातून हाकलून लावले. त्यानंतर दि. २६ व २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री संशयिताने पत्नीचे स्वत:सह असलेले छायाचित्र व्हायरल केले. पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news