जळगाव : शहरात गावठी पिस्टल घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक | पुढारी

जळगाव : शहरात गावठी पिस्टल घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक

जळगाव पुढारी वृत्तसेवा  : शहरातील पांडे डेअरी चौकात बेकायदेशीर गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपी पवन उर्फ माठ्या केशव गावळे (वय २४) रा. संभाजी चौक, शिवाजी नगर याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार ( दि. १) सायंकाळी ७ वाजता अटक केली. त्यांच्या ताब्यातील १५ हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पांडे डेअरी चौकात तरूण हातात गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल मिलींद सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ मिलींद सोनवणे, पो. ना. विकास सातदिवे, सचिन पाटील, छगन तायडे यांनी सायंकाळी ७ वाजता पांडे डेअरी चौकात पवन उर्फ माठ्या केशव गावळे (वय-२४) रा. संभाजी चौक, शिवाजी नगर याला ताब्यात घेतले.

त्याची अंग झाडाझडती घेतली असता १५ हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा मिळून आला. एमआयडीसी पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याच्या ताब्यातील गावठी कट्टा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मिलींद सोनवणे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button