जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

जळगाव : आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छाया : चेतन चौधरी)
जळगाव : आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छाया : चेतन चौधरी)

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेत रोष निर्माण झाला असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरच्या वतीने आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात 'गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!' अशी घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात स्थलांतरित झाले. तसेच पोलिस भरतीवर स्थगिती आणली. त्यामुळे युवकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून, युवकांना रोजगाराचे खोट्या आश्वासनांचे गाजर दाखविल्याबद्दल निषेध करत असल्याचे महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक महानगर अध्यक्ष रिंकू उमाकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी वाल्मीक पाटील, अमोल कोल्हे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, इब्राहिम तडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या घोषणांनी दणाणला परिसर…

आंदोलनात मोदी, शहा, शिंदे, फडणवीस, उदय सामंत यांची प्रतिमा असणारी कागदी विमाने हवेत उडवून शिंदे-फडणीस सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनात कार्यकर्त्यांनी "महाराष्ट्राचे गद्दार… गुजरातचे वफादर..!, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा निषेध..!, गुजरात तुपाशी… महाराष्ट्र उपाशी ..!, द्या आमच्या रोजगाराची हमी… बंद करा गुजरातची गुलामी..!, गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके ..! या घोषणा देऊन सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news