धुळे : महाराणा प्रताप यांचा पराक्रमाचा इतिहास देशासाठी गौरवास्पद – आ. पाटील

धुळे : महाराणा प्रताप यांचा पराक्रमाचा इतिहास देशासाठी गौरवास्पद – आ. पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा : महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचा इतिहास देशासाठी स्वाभिमान आणि गौरवाचा आहे. त्यांच्या पराक्रमाने प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन आ. कुणाल पाटील यांनी केले. आ.पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

मेवाड नरेश आणि वीर योध्दा महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आ. कुणाल पाटील यांनी माल्यार्पण करुन महाराणा प्रताप यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना आ. कुणाल पाटील म्हणाले, आपल्या मातृभूमीसाठी लढणारे आणि शत्रूला कधीही शरण न गेलेले महाराणा प्रताप यांचा इतिहास सुर्वण अक्षरांनी लिहीला गेला. त्यामुळे आजही त्यांच्या पराक्रमामुळे आपल्याला प्रेरणा मिळत असते.

यावेळी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, जसपालसिंग सिसोदिया, निलेश जाधव, पुतळा समितीचे अध्यक्ष अजित राजपूत, सागर पाटील, अ.भा.क्षत्रिय राजपूत महासभेचे तालुकाध्यक्ष गोकुळ राजपूत, तेजपाल राजपूत आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news