पुणे : अंतिम प्रभागरचना आठवडाभरात होणार जाहीर? | पुढारी

पुणे : अंतिम प्रभागरचना आठवडाभरात होणार जाहीर?

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य निवडणूक विभागाने येत्या मंगळवारी महापालिका आयुक्तांसह निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांना मुंबईला बोलाविले आहे.
या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंतिम प्रभागरचनेचे सादरीकरण होणार असल्याचेही सांगण्यात आले.

Market : सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर, सोने आणखी महागले!

राज्यातील तब्बल 18 हून अधिक महापालिकांचा कार्यकाळ संपला असून, त्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासंबंधीचा कायदाही विधिमंडळात एकमताने करण्यात आला आहे. दरम्यान, यासंबंधीच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, 11 मार्चपर्यंत प्रभागरचना करण्याची जी कार्यवाही झाली होती, तीच पुढे कायम ठेवण्याचे आदेशही दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी किरीट सोमय्यांचे षडयंत्र; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पुणे महापालिकेच्या 58 प्रभागांवरील हरकती व सूचनांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून ’यशदा’चे महासंचालक एस. चोकलिंगम यांनी प्रभाग रचनेचा अहवाल 10 मार्चला राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेला आहे. आता केवळ निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचना करणे बाकी आहे.

संशोधन : चंद्रावरील माती करू शकते ऑक्सिजन, ऊर्जेची निर्मिती

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुणे महापालिकेचा प्रभागरचनेचा अंतिम आराखडा या आठवड्यात जाहीर होईल, अशी माहिती
वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.

Back to top button