नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जयपूर येथे सुनील गायकवाड आणि बगड्डू येथे दोधा पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीतून 136 उमेदवारांनी माघार घेतल्याने 14 ग्रामपंचायतींमधील 73 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. जयपूर ग्रामपंचायत सरपंच सुनील गायकवाड यांच्यासह संतोष पवार, ललिता बागूल, सुनीता बागूल, बळीराम खैरे, ज्योती चौधरी, तुकाराम चौधरी, संगीता चौरे हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. कळवण खुर्द येथे भाऊसाहेब माळी, मंगला पवार, बाबाजी निकम, रेखा गांगुर्डे, राजेंद्र गवळी, माया पवार, बायजाबाई जाधव, भगवान शिंदे, जागृती पगार यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, तेथे सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. भादवण येथे अतुल जाधव, राणी जाधव, वैशाली जाधव, आबा पवार, राणूबाई सोनवणे, सीमा खैरनार, बाजीराव जाधव, नंदू जाधव, भारती पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंचपदासाठी मात्र चुरशीची निवडणूक होत आहे. कुंडाणे (ओ.) ग्रामपंचायतीमध्ये नारायण गांगुर्डे, कुसुम पगार, नारायण गांगुर्डे, रवींद्र आहेर, सुनील देवरे यांची बिनविरोध निवड झाली. बगडूमध्ये विठोबा सोनवणे, विठाबाई माळी, मालती वाघ तर साळूबाई सोनवणे या दोन ठिकाणी बिनविरोध झाल्या. देसराणे ग्रामपंचायतीमध्ये सिंधूबाई सोनवणे या बिनविरोध झाल्या, तर निवाणे ग्रामपंचायतीमध्ये मीना माळी या बिनविरोध झाल्या गोळाखाल ग्रामपंचायत उत्तम चौरे, मनीषा बहिरम, राजेंद्र आहेर, अनिता भोये, इंदिरा गायकवाड, पंडित चौधरी, श्रीराम गायकवाड, शैला पवार या बिनविरोध निवडून आल्या. पिळकोस ग्रामपंचायतीमध्ये अक्काबाई सोनवणे, कल्पना मोरे, भरत पवार हे बिनविरोध झाले. शिरसमणीमध्ये मंगला पवार, सुनंदा शिरसाठ, केदाबाई वाघ, कासूबाई भंडवे, वाडी बु. मध्ये शीतल पवार, कलाबाई चव्हाण, शिवाजी निकम, वंदना सूर्यवंशी, अशोक गवळी हे बिनविरोध निवडून आले. सुळेमध्ये वैशाली गवळी, प्रमिला गावित, कविता बागूल, राधा भोये, माया बर्डे बिनविरोध निवडून आल्या.