ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा

देवळा : मटाणेच्या थेट सरपंचपदी मोहन पवार यांची अविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करतांना समर्थक कार्यकर्ते. (छाया : सोमनाथ जगताप)
देवळा : मटाणेच्या थेट सरपंचपदी मोहन पवार यांची अविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करतांना समर्थक कार्यकर्ते. (छाया : सोमनाथ जगताप)

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. बुधवारी (दि.7) सरपंचपदासाठी 55 पैकी 23 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे भऊर आणि मटाणे गावाची सरपंचपदाची निवडणूक टळली. तर, 345 पैकी 133 उमेदवारांनी माघार घेतल्याने 50 ग्रामपंचायत सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

फुलेनगरच्या सातही सदस्यांची अविरोध निवड झाली असली तरी येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत आहे. आता उर्वरित 11 सरपंचपदासाठी 30, तर 12 ग्रामपंचायतींच्या 77 सदस्यपदांसाठी 160 उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांश जागांसाठी अखेरच्या क्षणापर्यंत समन्वय साधण्याचे प्रयत्न झालेत. मात्र, प्रत्येकाला यश मिळू शकले नाही. या घडामोडींमुळे देवळा तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. विठेवाडी, कनकापूर या गावांमध्ये एकही जागा अविरोध होऊ न शकल्याने सर्व जागांवर निवडणूक होत आहे. दहिवड – 7, भऊर – 6, खामखेडा – 1, मटाणे – 7, डोंगरगाव – 8, वाजगाव – 1, श्रीरामपूर – 3, सटवाईवाडी – 5, चिंचवे – 3, फुलेनगर – 7, वासोळ -2 याप्रमाणे अविरोध सदस्य निवडले गेलेत. सर्वांत प्रतिष्ठेच्या मटाणे ग्रामपंचायतीत सरपंचपदी मोहन पवार, तर सदस्यपदी सरला केदारे, सुदर्शन वाघ, संदीप ठुबे, गंगाधर केदारे, सीताबाई वाघ, छबुबाई पवार, वैशाली आहिरे हे उमेदवार अविरोध निवडून आले. जवळपास सर्वच उमेदवार अविरोध झाले असा अंदाज असताना एका जागा रिक्त राहिली. दहिवड ग्रामपंचायतीत निर्मला सोनवणे, मैना अहिरे, वामन ठाकरे, दिगंबर सोनवणे, इंदुबाई अहिरे, लताबाई देवरे, दीपक ठाकर हे अविरोध सदस्य जातील. डोंगरगाव ग्रामपंचायतीत सर्वाधिक आठ सदस्य अविरोध झाले, त्यात दत्तू सावंत, रत्नाबाई सावंत, अश्विनी आहिरे, लताबाई हिरे, संगीता निकम, अश्विनी सावंत, मोठाभाऊ पानसरे, संजय सावंत यांचा समावेश आहे. सरपंच व एका सदस्यपदासाठी प्रत्येकी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भऊरच्या सरपंचपदी चित्रा मोरे, तर सदस्यपदी खंडू माळी, विजया माळी, मिना पवार, दादाजी मोरे, गंगाधर ठाकरे, माधुरी माळी यांची अविरोध निवड झाली.

अविरोध उमेदवार असे…
श्रीरामपूर – शोभा पवार, वैशाली सावंत, लीलाबाई पवार, खामखेडा – मीनाबाई आहिरे, वाजगाव – केदाबाई आहेर, वासोळ – गोरख भामरे, भिकुबाई पवार, चिंचवे – नानाजी मोरे, नितीन वाघ, दयाराम मोरे, सटवाईवाडी – मनीषा नवले, विलास भामरे, शालिनी चव्हाण, गुलाब पवार, सतीश आहेर.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news