नाशिक : नानासाहेब कापडणीस यांच्या खून प्रकरणात पुरावे गोळा

नानासाहेब कापडणीस, अमीत कापडणीस
नानासाहेब कापडणीस, अमीत कापडणीस
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालमत्ता हडप करण्याच्या हेतूने संशयित राहुल जगताप याने नानासाहेब कापडणीस यांना पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे नेऊन त्यांचा खून करीत मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी मोखाडा येथील घटनास्थळी जाऊन महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. राहुलने खून केला त्या दिवशी कुठे कुठे भेटी दिल्या, जाण्याचा व येण्याचा मार्ग, बोटांची, वाहनाच्या चाकांची ठसे आदी पुरावे गोळा केले आहेत.

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित यांच्या खून प्रकरणी राहुल जगतापला अटक केली आहे. संशयित राहुलने कापडणीस यांची मालमत्ता हडप करण्यासाठी पितापुत्राचा कट रचून थंड डोक्याने खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तपासात राहुलने नानासाहेब कापडणीस यांचा खून केला त्या ठिकाणी घेऊन गेले. नानासाहेब यांचा मृतदेह कुठे फेकला, पुरावा कसे नष्ट केले याची सर्व माहिती पोलिसांनी घेतली. जगतापने कापडणीस यांचा खून केल्यानंतर त्यांचे कपडे व अन्य साहित्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला ते पुरावेदेखील पोलिसांनी जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राहुल याने नानासाहेब यांचे शेअर्स विक्री करून आलेल्या पैशांमधून त्याचे कर्ज फेडल्याचे समोर येत आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल जगताप याचे स्थानिक नागरिकांसोबतही वाद होत असल्याचे समजते. कार पार्किंगवरून तो इतर रहिवाशांवर दमदाटी करत असे, अनेकांना शिवीगाळ व धमकावत असल्याचे बोलले जाते. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्याचे समजते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news