विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये | पुढारी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि.21) नाशिकच्या दौर्‍यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकार्‍यांचा मेळावा व विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने भाजप आगामी नाशिक महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे दुपारी 2.15 ला भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ना. फडणवीस काय बोलणार याकडे आता सार्‍यांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता पाथर्डी फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 5.35 ला सातपूरच्या शिवाजीनगर येथील वसंतराव कानिटकर उद्यान व सावरकर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 100 प्लसचा नारा दिला असून, त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारच्या ना. फडणवीस यांच्या दौर्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दौर्‍याच्या यशस्वीतेसाठी पक्षातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button