नाशिक शहरातील पहिल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन

नाशिक : पहिल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन करताना खासदार श्रीकांत शिंदे. समवेत पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, राजू लवटे, प्रवीण तिदमे आदी.
नाशिक : पहिल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन करताना खासदार श्रीकांत शिंदे. समवेत पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, राजू लवटे, प्रवीण तिदमे आदी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुख्यालयाच्या आवारातील पहिल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ई-सेवा केंद्राचे लोकार्पणही यावेळी पार पडले. नाशिक शिवसेनेच्या वतीने सर्व सुविधांनी युक्त असा फिरता दवाखाना यावेळी नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आला.

दिल्ली येथील यूएनडीपी कंपनी प्रशासनाने शहरातील १९ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असून याअंतर्गत हे स्टेशन उभारण्यात येणार आहेत. शहरांमधील हवा व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारने शून्य प्रदूषण करणार्‍या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले असून, या धोरणांतर्गत नाशिक महापालिकेनेही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे धोरण आखले. पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमधून निर्माण होणार्‍या प्रदूषणामुळे पर्यावरणावरच विपरित परिणाम होत असल्याने केंद्र सरकारने २०३० पर्यंत 'शतप्रतिशत' इलेक्ट्रिक कार रस्त्यावर उतरवण्याचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत नाशिक महापालिकेनेही सीएनजी व इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण घेतले आहे. इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देताना जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशनही उभे करण्यासाठी दिल्ली येथील यूएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. यूएनडीपी कंपनी प्रशासनाने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सह संपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

प्रस्तावित चार्जिंग स्टेशन
महापालिका राजीव गांधी भवन, मनपा पश्चिम कार्यालय, गंगापूर रोडवरील महाजन गार्डन, सातपूर कॉलनी, उपनगर येथील मातोश्रीनगर, बिटको हॉस्पिटल, झाकिर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील पार्किंग, महात्मानगर पटांगण, राजे संभाजी स्टेडियम, फाळके स्मारक, गोदावरी किनारी भाजी मार्केट, गोल्फ क्लब मैदान, पंचवटी तपोवन मंदिर आदी.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news