शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी महाबीज निर्मिती करावी: बाबासाहेब कोटकर

शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी महाबीज निर्मिती करावी: बाबासाहेब कोटकर
Published on
Updated on

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांनी पिकांची गुणवत्ता व उत्पादनवाढीसाठी महाबीज निर्मित द्रवरुप जैविक खते व जैविक बुरशीनाशकांचा वापर करण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब कोटकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा मार्फत गुणवत्तापूर्वक द्रवरूप जैविक खते व जैविक बुरशीनाशक यांचे उत्पादन करत आहे. या जैविक द्रवरूप खते व बुरशीनाशक यांचा शेत जमिनीत उपयोग केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनामध्ये 15 टक्के पर्यंत वाढ होते. ही जैविक द्रवरूप खते व बुरशीनाशके महाबीज अकोला येथे तयार करण्यात आली आहे.

कापूस, कांदा, सोयाबीन, मका, केळी, पपई, डाळींब भाजीपाला व फळवगीय पिकासाठी द्रवरुप जैविक खते व जैविक बुरशीनाशके अत्यंत उपयुक्त असून जैविक खते जिवाणू सेंद्रीय व सजीव असून यात कोणतेही अपायकारक घटक नाहीत. ही जैविक खते व बुरशीनाशके जमिनीत वापरल्यास त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून नत्र स्थिरीकरण, स्फुरद, पालाश या अन्न द्रव्याचा उपलब्धतेत लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते.

तसेच हे जिवाणू जमिनीतील अद्राव्य स्वरुपात स्थिर झालेले स्फुरद व पालाश पिकांना उपलब्ध करुन देते. पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढणे, फळाची गुणवता वाढविणे, टिकवण्याची क्षमता वाढविणे याकरिता पालाश व स्फुरद हे अन्नघटक पिकासाठी महत्वाचे आहेत. ट्रायकोर्डमा या जैविक बुरशी नाशकामुळे जमिनीतील अपायकारक व रोग पसरविणाऱ्या बुरशीची वाढ न होऊ देता जमिनीतील रोगकारक, हानिकारक बुरशीच्या नायनाट करते. तसेच या जैविक बुरशीनाशके जमिनीतील हानिकारक बुरशी कमी करते व त्यामुळे पिकाची जोमात वाढ होवून पिक निरोगी राहून उत्पादनात वाढ होते.

महाबीज स्वःउत्पादित द्रवरुप जैविक खते पर्यावरण पुरक असून जमिनीची सुपीकता व पोत सुधारुन जीवजंतू व मित्रकिडींना कसलाही धोका होत नाही. पिकांची रोग व किड प्रतिकारशक्ती वाढते, रासायनिक खताचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते. द्रवरुप जैविक खताचा संघ महाबीज महाजैविक हे सुद्धा नव्यानेच शेतकऱ्यांना 250 मिली या पॅकिंगमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे.

द्रवरुप जैविक खते ड्रीपद्वारे एकरी 1 ते 2 लिटर प्रती एकर क्षेत्रसाठी व ड्रेचिंग द्वारे जमिनीत देण्यासाठी 2 लिटर प्रति एकर अश्या प्रमाणात देण्यात यावे. जैविक बुरशीनाशके ट्रायकोर्डमा एकरी 2 किलो शेणखतात मिसळून समप्रमाणात देण्यात यावा. सदर द्रवरुप जैविक खते 250,500,1000 मिली या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. जैविक बुरशीनाशक ट्रायकोर्डमा 1 किलो पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे जैविक खते महाबीज बियाणे विक्रेते महाबीज जिल्हा कार्यालय धुळे, शहादा तसेच बीज प्रक्रिया केंद्र, दोंडाईचा येथे सवलतीच्या  दरात उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ येथील जिल्हा व्यवस्थापक कोटकर यांनी दिली आहे.

-हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news