दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक

नाशिक मनपा साफसफाई  www.pudhari.news
नाशिक मनपा साफसफाई www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिवाळी उत्सवात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये कचरा साचत असल्याने परिसर स्वच्छतेकरिता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिवसा स्वच्छता केली जातेच. परंतु, आता रात्रीदेखील स्वच्छता करण्यात येणार असून, तशा प्रकारच्या सूचना स्वच्छता निरीक्षक तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

शहरातील रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, भद्रकाली, शालिमार या भागांत मोठ्या बाजारपेठा आहेत. या भागात खरेदीसाठी शहरातील विविध भागांबरोबरच ग्रामीण भागांतूनही ग्राहक येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने हा कचरा उचलण्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: पश्चिम आणि मध्य नाशिक या भागांत बाजारपेठा असल्याने या ठिकाणी दिवसा आणि रात्रीचीही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. पश्चिम विभागात एकूण ३८ घंटागाड्या कचरा संकलनासाठी आहेत. त्यात अतिरिक्त चार घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य विभागातही जवळपास ४० गाड्या असून, आणखी तीन ते चार गाड्या अतिरिक्त तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील इतरही नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर या चार विभागांमधील बाजारपेठांतील करण्यासाठीही स्वच्छता निरीक्षक आणि विभागीय स्वच्छता निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीत रेडीमेड कपड्यांचे प्लास्टिक कव्हर, फटाके, विविध भेटवस्तूंचे आवरण तसेच अनेक वस्तूंचे रॅपर्स यांच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. त्यामुळे रात्री बाजारपेठा बंद झाल्यानंतर उचलला जाऊन तेथील स्वच्छता आदल्या दिवशीच व्हावी, हा या स्वच्छता मोहिमेमागील उद्देश असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news