SLvsIRE T20 World Cup: श्रीलंकेचा आयर्लंडवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय | पुढारी

SLvsIRE T20 World Cup: श्रीलंकेचा आयर्लंडवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी 20 विश्वचषक पात्रता फेरीत नामिबियाकडून पराभूत झालेल्या श्रीलंकेच्या संघाने सुपर-12 मध्ये विजयाने सुरुवात केली. त्यांनी आयर्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. 2014 च्या चॅम्पियन श्रीलंकेने प्रथम आयर्लंडला 128 धावांवर रोखले. त्यानंतर 15 षटकांत एका विकेटवर 133 धावा केल्या. या विजयाचा नायक सलामीवीर कुशल मेंडिस ठरला. 27 वर्षीय मेंडिसने 68 धावांची इनिंग खेळली. त्याने डी सिल्वासोबत 63 धावांची भागीदारी केली. त्यानंतर चारिथ अस्लंकाने पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भर घातल्याने संघाचा विजय झाला. मेंडिसने षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.

फिरकीपटूंची अप्रतिम कामगिरी

श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी अप्रतिम कामगिरी केली. त्यांनी 8 पैकी 5 विकेट घेतल्या. तर वेगवान गोलंदाजांच्या खात्यात 3 विकेट आल्या. श्रीलंकेचे गोलंदाज एकामागून एक विकेट घेत राहिले. त्यामुळे आयर्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

भेदक मारा केल्यानंतर श्रीलंकेने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या सलामीवीरांनी 63 धावांची भर घातली. पहिली विकेट धनंजया डी सिल्वाच्या रुपात पडली. त्याने 31 धावां केल्या. त्याचवेळी कुशल मेंडिसने 68 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 158.13 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. मेंडिसने 43 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. चरित अस्लंकाने नाबाद 31 धावांचे योगदान दिले.

आयर्लंडचा संघ :

पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क अडायर, सिमी सिंग, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल.

श्रीलंका संघ :

कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरित अस्लंका, अशेन बंदारा, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षना, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा.

 

 

 

 

 

 

Back to top button