Prakash Abitkar | राज्यात कर्करोग रुग्णांसाठी ‘महा केअर’ सुविधा कार्यान्वित : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

धुळ्यात महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन बांधील : पालकमंत्री जयकुमार रावल
 Health Minister Prakash Abitkar
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर Pudhari
Published on
Updated on

Dhule Hospital Inauguration

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कर्करुग्णांसाठी ‘महा केअर’ सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. आगामी काळात राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व बळकट करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

धुळे येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासह एमआरआय केंद्र, अपघात विभाग आणि शवविच्छेदन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 Health Minister Prakash Abitkar
Dhule Ganja News: शिरपूरच्या जुनापाणी शिवारात वनजमिनीवर कापसाच्या आड गांजाच्या रोपांची लागवड

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महापौर मायादेवी परदेशी, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, त्या उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले महिला व बाल रुग्णालय आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले झाले असून, त्याचा मोठा फायदा रुग्णांना होणार आहे.

 Health Minister Prakash Abitkar
Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त

धुळे जिल्ह्यातून अनेक महामार्ग जात असल्याने अपघातांच्या घटनांमध्ये तातडीने उपचाराची आवश्यकता असते. त्यामुळे जिल्ह्यासाठी ५० खाटांचे क्रिटिकल केअर रुग्णालय मंजूर करावे, तसेच बालकांसाठी अतिदक्षता विभाग कार्यान्वित करावा, अशी मागणी त्यांनी केली. शिंदखेडा व दोंडाईचा येथील मंजूर रुग्णालयांसह जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजित करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 Health Minister Prakash Abitkar
Dhule News: धुळ्याच्या पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे लाचखोर उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई गजाआड

आरोग्य सेवा अधिक सक्षम करणार

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची शासकीय आरोग्य संस्थांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. धुळ्यातील १०० खाटांच्या रुग्णालयाचे २०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करुग्णांसाठी ‘महा केअर’ सुविधा सुरू करण्यात आली असून, भविष्यात राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येतील. सिकलसेल रुग्णांचा शोध घेण्यासाठी अभियान स्वरूपात मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्य दिनापासून जन आरोग्य समित्या कार्यान्वित करण्यात आल्या असून, त्यांच्या सदस्यांशी लवकरच संवाद साधण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे आबिटकर यांनी सांगितले.

यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल आणि डॉ. तुळशीराम गावित यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.

 Health Minister Prakash Abitkar
Prakash Abitkar | गर्भलिंग निदान; पती-पत्‍नीसह कुटुंबालाही ‘मोका’ लावणार

सोनगीर ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, सरपंच लखन ठेलारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, सामाजिक कार्यकर्ते बापू खलाणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, सोनगीर परिसराचा झपाट्याने विकास होत असून, त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचेही सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असून, प्रत्येक रुग्ण सेवा समिती तातडीने कार्यान्वित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

आमदार राघवेंद्र पाटील यांनी सोनगीर येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित करण्याबरोबरच रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी केली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news