Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त

महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई, पोलीस बळाचा वापर
Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त
Published on
Updated on

धुळे : धुळे शहरातील जेल रोडवर संविधान जागर समितीने आंदोलनासाठी उभारलेले शेड आणि पत्र्याची खोली काल पोलिसांच्या बळाचा वापर करून महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने उध्वस्त केली. या कारवाईदरम्यान महापुरुषांच्या छायाचित्रांची विटंबना झाल्याचा आरोप संविधान जागर समितीचे आनंद लोंढे यांनी केला. पोलिसांनी अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईला विरोध करणाऱ्या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, याच रस्त्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय स्वतःहून काढून घेण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने त्यांना सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली. तर राजकीय पक्षांचे कार्यालय तोडण्यासाठी हिंदू युवा सेनेने जेल रोडवर भर रस्त्यात आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलनही सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले.

Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त
Dhule Crime | धुळे जिल्ह्यातून १२ सराईत गुन्हेगार हद्दपार; पिस्तूल बाळगणारे दोघे नवलनगरजवळ जेरबंद

धुळ्यातील जेल रोडवरील पाच कंदील चौकातील फळ बाजारातील दुकानदारांसाठी महानगरपालिकेने तात्पुरते शेड उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या रस्त्यावर जेलपासून बाफना हायस्कूलपर्यंत दुतर्फा शेड उभारण्यात आले आहेत. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपले कार्यालय थाटले. या कार्यालयाचे चार दिवसांपूर्वी संपर्कप्रमुख भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

तर संविधान जागर समितीने विविध संघटनांना आंदोलन करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले होते. या शेडमध्ये समितीने आंदोलन सुरू केले होते. तसेच शेडला लागूनच महिला कार्यकर्त्यांसाठी पत्र्याची एक खोली उभारण्यात आली होती.

Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त
Dhule Crime | 'सेकंड करन्सी'च्या आमिषाने लूट करणाऱ्या टोळीतील एकाला अटक; अन्य साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान तत्कालीन खासदार हिनाताई गावित यांच्या गाडीची मोडतोड झाली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने आंदोलनांसाठी जेल रोडवरील जागा निश्चित केली होती. त्यामुळेच संविधान जागर समितीने एक शेड उभारून या ठिकाणी आंदोलनाची सोय केली असल्याची माहिती समितीचे प्रमुख आनंद लोंढे यांनी दिली.

दरम्यान, राजकीय पक्षांनी या रस्त्यावर आंदोलनाच्या नावाखाली अतिक्रमण केल्याचा आरोप करून हिंदू युवा सेनेचे विकी परदेशी, रोहित चांदोडे, अमोल सूर्यवंशी तसेच अन्य कार्यकर्त्यांनी जेलसमोर भर रस्त्यात स्टेज उभारून आंदोलन सुरू केले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त
Dhule Crime News: धुळेत करन्सी डीलच्या बहाण्याने व्यापाऱ्याची लूट

अखेर आज महानगरपालिकेचे पथक पोलिसांचा फौजफाटा घेऊन अतिक्रमण निर्मूलनासाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून कार्यालयाचे कथित अतिक्रमण काढून घेण्याचे मान्य केले. त्यामुळे त्यांना सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली.

तर संविधान जागर समितीच्या कार्यकर्त्यांची अतिक्रमण निर्मूलन पथकाबरोबर बाचाबाची सुरू झाली. जुनी महानगरपालिकेच्या इमारतीला दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी एक प्रवेशद्वार राजकीय पक्षाचा वरदहस्त असलेल्या एका संघटनेने बंद करून ठेवले आहे. हे प्रवेशद्वार आधी मोकळे करावे, तसेच शिवाजी हायस्कूलसमोरून थेट जेल रोडवर येणाऱ्या रस्त्यावर पक्की इमारत बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. ही इमारतदेखील पाडण्यात यावी. त्यानंतर आम्ही शेड स्वतःहून काढून घेऊ, अशी भूमिका संविधान जागर समितीने घेतली.

Dhule News : जेल रोडवर संविधान जागर समितीचे आंदोलनासाठी उभारलेले शेड, पत्र्याची खोली जमीनदोस्त
Dhule Accident : धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत दांपत्य जागीच ठार

यानंतर सुमारे दोन तास हा घोळ सुरूच होता. अखेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भामरे, मनपाचे उपायुक्त राजेंद्र माईनकर तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली.

त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर हे शेड आणि पत्र्याची खोली जमीनदोस्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news