Dhule crime : धुळ्यात आईचे सोने हडप करण्यासाठी खोटी फिर्याद देणाऱ्या महिलेस अटक

Dhule crime
Published on
Updated on

धुळे : शहरातील वलवाडी परिसरात घरातून पाच लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची तक्रार एका महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिली. मात्र तपासात या महिलेने आईचे सोने हडप करण्यासाठी खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार तपासात उघड झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारदार महिलेला अटक केली असून तिच्या ताब्यातून सोने जप्त केले आहे.

Dhule crime
Nashik Crime : भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटणाऱ्या 'बंटी-बबली' दाम्पत्याला अटक, अंबड पोलिसांची मोठी कारवाई

धुळ्यातील वलवाडी शहरातील सुंदर नगर मधील प्लॉट क्रमांक सात येथे राहणाऱ्या सोनल भास्कर बागले यांनी चोरी झाल्याची फिर्याद पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांच्या घरातून आई कस्तुरीबाई यांचे सोन्याचे मंगळसुत्र माळ, सोन्याची छोटी माळ, सोन्याच्या 2 बांगडया व सोन्याची पोत असा एकुण 5 लाख 60 हजार रु. किं.चे 90.30 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेल्याने भारतीय न्याय संहिता क. 305 (1) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Dhule crime
Jamner Burglary Case | जामनेरमध्ये 12 लाखांच्या घरफोडीचा छडा; दोन आरोपी अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

यासंदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी तपास सुरू केला. परिस्थितीजन्य पुरावे, घटनास्थळाचे आजुबाजूचे साक्षीदार, फिर्यादी यांनी दिलेली फिर्याद व तपासात त्यांच्याकडे करण्यात येत असलेली विचारपुस यातील विसंगती आणि वारंवार फिर्यादी यांच्यावर संशय बळावत होता. त्यामुळे त्यांनी फिर्यादी सोनल भास्कर बागले यांच्याकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

Dhule crime
Nanded crime : नायगाव शहरात चोरट्याचा धुमाकुळ; पोलिस स्थानकाजवळील ५ दुकाने फोडली

गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने काढून दिल्याने हे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अशाप्रकारे फिर्यादी मुलीनेच केला आईचे सोने चोरीचा बनाव तपासात निष्पन्न झाला असून महिला आरोपीकडुन एकूण 5, लाख 60 हजार रु. किं.चे 90.30 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करुन पश्चिम देवपूर पोलीस ठाणे मधील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news