Jamner Burglary Case | जामनेरमध्ये 12 लाखांच्या घरफोडीचा छडा; दोन आरोपी अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव तालुक्यात घरफोडी; ४ लाखांची रोकड व दोन तोळ्यांची सोन्याची चैन लंपास
theft case
theft casePudhari Photo
Published on
Updated on

जळगाव : जामनेर शहरातील मदनी नगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा जामनेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर (वय २४, रा. बीएसएनएल टॉवरजवळ, घरकुल बिल्डिंग, जामनेर) आणि मोहम्मद फातीर उर्फ गोलू मिया तुफेल मोहम्मद (वय २०, रा. मदनी नगर, जामनेर) अशी आहेत. दोघांना २९ जून २०२६ रोजी रात्री ९.५४ वाजता अटक करण्यात आली.

theft case
Jalgaon Police Raid | जळगावात मोठी कारवाई : एकाच दिवशी चार जुगार अड्ड्यांवर छापेमारी; ८ बुकी जेरबंद

या प्रकरणी मसूद अख्तर मुझफ्फर हुसेन (वय ५०, व्यवसाय – इमाम, रा. मदनी नगर, प्लॉट क्र. ४२, जाकरिया मशिदीमागे, जामनेर) यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, २५ जून रोजी रात्री ८ ते २९ जून रोजी सकाळी ७.१५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान ऐवज लंपास केला.

चोरी झालेल्या ऐवजात सुमारे २९.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार वजनाचे चांदीचे दागिने तसेच ४ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. यात सोन्याचा हार, मोतीपोथ, अंगठ्या, मुरणी, बाळी, सोन्याचा तुकडा तसेच चांदीच्या पट्ट्या आणि अंगठ्यांचा समावेश आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत असून, चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यासह या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

theft case
Jalgaon Police Alert | ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट; सीमावर्ती भागात वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी

चाळीसगाव तालुक्यात घरफोडी; ४ लाखांची रोकड व दोन तोळ्यांची सोन्याची चैन लंपास

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तांबोळा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ४ लाख रुपयांची रोख रक्कम आणि दोन तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार विलास रघुनाथ पाटील (वय ४८, व्यवसाय – शेती, रा. तांबोळा बुद्रुक, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कडी-कोंडे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी आणि पत्र्याच्या कपाटात ठेवलेली ४ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच दोन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेली.

theft case
Lightning Strike Jalgaon | शेतात काम करत असताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम बेग पुढील तपास करीत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news