धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचातीसाठी झालेले मतदानाचा निकालात भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. ३१ पैकी २५ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा लागला आहे. त्यात शिरपूर तालुक्यातील १५ पैकी १३, शिंदखेडा तालुक्यातील १३ पैकी ११ तर साक्रीत ३ पैकी २ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिली आहे.
धुळे जिल्ह्यातील ३१ पैकी २५ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये शिरपूरला भाजपा १३, शिंदखेडा ११, साक्रीत २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मते देऊन निवडून दिले आहे अशी प्रतिक्रिया विजयानंतर जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी व्यक्त केली आहे. सरपंच, सदस्य यांचे अभिनंदन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील जनतेने ३१ पैकी २५ ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सरपंच पदावर निवडून देत भाजपावर जनतेने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. सर्व मतदारांचे मनापासून आभार तसेच सर्व विजयी उमेदवारांचे व या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :