धुळे : मैंदाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला

पिंपळनेर : साक्री तालुक्यातीलं मैंदाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयोत्सव साजरा करताना ग्रामपंचायत सदस्य. (छाया:अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : साक्री तालुक्यातीलं मैंदाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयोत्सव साजरा करताना ग्रामपंचायत सदस्य. (छाया:अंबादास बेनुस्कर)
Published on
Updated on

पिंपळनेर, ता. साक्री : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील मैंदाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मैंदानेचे सरपंच व शिवसेना उपतालुका प्रमुख कैलास ठाकरे यांच्या पॅनलचे भाईदास भारडे, धनाबाई भारडे असे तीनपैकी दोन जागांवर भरघोस मतांनी निवडून आले.

यावेळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साक्री येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात विजयी ग्रामपंचायत सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या नावाचा जयघोष केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अप्पा वाघ, पिंपळनेर तालुका प्रमुख, सरपंच हिम्मत साबळे, कैलास ठाकरे यांच्या हस्ते नियुक्त ग्रामपंचायत सदस्य भाईदास भारूडे व धनाबाई भारूडे यांचा सत्कार केला. त्यांनी सर्व मैंदाने गावातील जनतेचे व मतदार दात्यांचे आभार मानले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news