कल्पना पंढरीनाथ सूर्यवंशी-माळी (रा.रोजगाव, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार सकाळी ८ च्या सुमारास दिलीप सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, मुकेश सूर्यवंशी व राहुल सूर्यवंशी (रा.रोजगाव, ता. साक्री) यांनी फिर्यादी यांच्या शेतात संगनमताने ट्रॅक्टर घूसवून बांधणी केलेल्या शेताचे नुकसान केले. तसेच फिर्यादीचे पती पंढरीनाथ, राज व विशाल या दोन्ही मुलांना शिवीगाळ करीत मारहाण केली. संशयितांविरूध्द निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.