पादचारी महिलेची सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी सोन्याची चैन विक्री करणारी महिलेसह खरेदी करणाऱ्या सराफाला नोटीस बजावण्यात आली असून त्यांना तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.