Laal Singh Chaddha : लालसिंग चढ्ढामधील ‘त्या’ दृश्यांवर लष्करातील अधिका-यांच्याही प्रतिक्रिया, वाचा काय आहे ‘या’ वादग्रस्त दृश्यांमध्ये

Laal Singh Chaddha : लालसिंग चढ्ढामधील ‘त्या’ दृश्यांवर लष्करातील अधिका-यांच्याही प्रतिक्रिया, वाचा काय आहे ‘या’ वादग्रस्त दृश्यांमध्ये
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Laal Singh Chaddha लालसिंग चढ्ढा चित्रपट धार्मिक गोष्टीनंतर आता भारतीय लष्करावर चुकीच्या पद्धतीने दृश्य चित्रित केल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यावर लष्करातील अधिका-यांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

लाल सिंग चढ्ढा Laal Singh Chaddha हा आमीर खानचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा ठपका ठेवत अनेक संघटनांनी या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचे आवाहन केले होते. याचा चांगलाच परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला आहे. मात्र, हा चित्रपट आता आणखी एका नवीन वादात सापडलाय. अनेकांच्या म्हणण्यानुसार, आमीर खानने या चित्रपटातील काही दृश्यांमधून भारतीय लष्कराचा अपमान केला आहे. जाणून घेऊ या काय आहेत ही दृश्ये…

आमीरचा लाल सिंग चढ्ढा Laal Singh Chaddha हा मुव्ही फॉरेस्ट गंप या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचा ऑफिशिअल रिमेक आहे. ज्यामध्ये टॉम हैंक्स याने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट विएतनाम वॉरच्या दरम्यान चालवलेल्या मॅकनामॉरा ऑपरेशन वर आधारित होता. या युद्धा दरम्यान मॅकनामॉरा याच्या पॉलिसीनुसार अमेरिकेत सैन्य शिल्लक नसल्याने देशातील अनेक गतीमंद तसेच काही अपंगांना देखील सैन्यात भरती करण्यात आले होते आणि त्यांना थेट व्हिएतनाममध्ये फ्रंटलाइनवर पाठवण्यात आले होते. नंतर या पॉलिसीचा अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. त्यापैकीच एक गतीमंद सैनिकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला त्यावेळी तब्बल सहा ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.

या चित्रपटाचा भारतीय रिमेक बनवताना आमीर खानने अमेरिका व्हिएतनाम वॉरची तुलना कारगील युद्धाशी केली आहे. सैन्यात लाल सिंग चढ्ढा या गतीमंद सैनिकाची भूमिका साकारली आहे. यामुळे भारतीय लष्कराचा अपमान झाला आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. भारतीय लष्करामध्ये प्रत्येक सैनिक शारीरिक-मानसिक दृष्ट्या फिट आहे का नाही हे तपासले जाते. तसेच युद्धात सैन्यावर फ्रंटलाइनला जे सर्वाधिक अनुभवी सैनिक आहे त्यांनाच पाठवले जाते. त्यामुळे आमीर खानला चित्रपट कॉपी करून बनवणे खूप महागात पडले आहे. आमीर खानने या प्रमाणे देशाच्या लष्कराचा अवमान केल्या प्रकरणी त्यावर कायदेशीर दावा ठोकण्याची तयारी काही वकिलांनी चालवली आहे. चित्रपटातील या दृश्यांवर लष्करातील अधिका-यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कारगिल युद्धातील कामगिरीमुळे परम विशिष्ट सेवा मेडल आणि अति विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित जनरल वेद प्रकाश मलिक यांनी यावर 'इंडिया टुडे'ला प्रतिक्रिया देताना म्‍हटलं आहे की, जे लोक आमच्या स्पेशल फोर्सेसच्या जवानांना मॅकनामॉरा सारख्या मूर्खांशी तुलना करतात ते स्वतःच मूर्ख आहेत. हा चित्रपट मी पाहिलेला नाही. Laal Singh Chaddha

लेफ्टनंट जनरल कमलजीत सिंह ढिल्लों ने प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, 'भारतीय सेनेच्या स्पेशल फोर्सेसचे जवान घातक आणि प्रोफेशनल बोर मशीन आहेत. मी वेद मलिक यांच्या म्हणण्याशी 100 टक्के सहमत आहे. कोणीही समजदार व्यक्ती त्यांना कोणत्याही वेगळ्या प्रकारे नाही दाखवणार. मी अशी कोणतीही गोष्ट पाहणार नाही ज्यामध्ये असे वेगळे काही तरी दाखवले जाते. जय हिंद!
या शिवाय लाल सिंग चढ्ढा चित्रपटात अशीही काही दृश्य आहेत जे मूळ फॉरेस्ट गंप चित्रपटात नाहीत.

उदाहरणार्थ मूळ चित्रपटात हा गतीमंद सैनिक एका सिनिअर अधिका-याचे प्राण वाचवतो असे दाखवण्यात आले आहे. तर आमीर खानने रिमेक बनवताना  गतीमंद एका अतिरेक्याचे प्राण वाचवतो. इतकेच नाही तर त्याच्यासोबत मैत्री देखील करतो. हे कथानक म्हणजे भारतीय सैनिकांचा सरळ सरळ अपमान आहे. पूजा करण्‍याबाबतचे त्‍याच्‍या विधानामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आक्षेप अनेक हिंदू संघटनांनी घेतला आहे. दरम्यान, अशा वादग्रस्त बाबींमुळे आमीर खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे याच्या कमाईवर मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news