धुळे : आदिशक्ती एकवीरादेवी मंदिर परिसर विकास कामास प्रारंभ

धुळे : श्री एकविरा देवी मंदिर विकास कामासाठी प्रारंभ करताना आमदार फारुख शाह. समवेत कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, उपअभियंता झालटे आदी मान्यवर. (छाया: यशवंत हरणे)
धुळे : श्री एकविरा देवी मंदिर विकास कामासाठी प्रारंभ करताना आमदार फारुख शाह. समवेत कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, उपअभियंता झालटे आदी मान्यवर. (छाया: यशवंत हरणे)
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा

प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत धुळे जिल्ह्यातील 'ऐतिहासिक पुरातन एकविरा देवी मंदिरासाठी पर्यटन विभागाच्या शासननिर्णयानुसार ३ कोटी रुपये मंजुर करण्यात आले. यात प्रामुख्याने सभामंडप दुरुस्ती करणे, भक्त निवास दुरुस्ती करणे व मंदीर परिसरातील इतर अनुषंगिक कामांचा समावेश आहे. आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी (दि.13) श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील विकास कामासाठी प्रारंभ करण्यात आला.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर मुख्य सचिव यांच्या निदेशानुसार मंजुर केलेल्या परंतु निविदा न काढलेल्या, तसेच कार्यादेश दिले. मात्र, काम सुरु न झालेल्या कामाच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करू नये अशा सूचना सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार एकविरा देवी मंदीर परिसरातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती. आदिशक्ती एकविरा देवी खान्देश वासियांचे कुलदैवत असल्याने मंदीर परिसराचा विकास होणे आवश्यक आहे, हि बाब लक्षात घेवून आ. फारुख शाह यांनी मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून स्थगिती उठविणेची मागणी केली. त्यानुसार पर्यटन विभागाने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून एकविरा देवी मंदीर परिसरातील विकास कामांबद्दल स्थगिती उठविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने केल्या जाणाऱ्या या कामात सभामंडप दुरुस्ती, भक्तनिवास दुरुस्ती, व इतर कामांचा समावेश आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकविरा देवी मंदीर परिसरातील विकास कामांची स्थगिती उठविली. त्याबद्दल आ. फारुख शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले आहे.

विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील,उपअभियंता झालटे,तसेच नासिर पठाण,गनी डॉलर, दीपश्री नाईक,मंगला मोरे,आसिफ शाह,रफिक शाह,साबीर सैय्यद,धनराज विभांडीक,अर्जुन बडगुजर ,अड.निलेश पाठक,प्रदीप गुरुजी,चतुर देवरे,दौलत पवार,अमृत कुवर,राजेश चत्रे ,बादल जुगलकर,राजु चौधरी, शाहविक्रम फुलपगारे,महेंद्र फुलपगारे,निसार अन्सारी विश्वनाथ ढोले.पंकज गिरासे,विठ्ठल वाघ, जगन माळी,बापू खालाने, चंद्रकांत जाधव,गजानन सोनार,बाबाजी पाटील,पौर्णिमा चौधरी, शारदा पाटील,लीलाबाई सैंदाने,प्रीती भावसार,रेखा चौधरी,सुलभा चौधरी,रेखा गायकवाड,ज्योती भावसार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news