मानवत; पुढारी वृत्तसेवा : शहरातील कुरेशी गल्लीतील एका घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संसारपयोगी साहित्य जळून राख होऊन सुमारे दिड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी ता १३ सकाळी ८:३० सुमारास घडली .
शहरातील कुरेशी गल्लीत फय्याज गफार कुरेशी यांचे घर असून सकाळी ८: ३० च्या सुमारास अचानक वरच्या मजल्यावर आग लागली. या आगीत ३ खण माळवद ,घरातील अन्य धान्य व कपाटातील १० हजार व संसारपयोगी साहित्य असा एकूण दिड लाखाचा माल जळून खाक झाला. नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली परंतु अरुंद रस्त्यामुळे गाडी आत गेली नसल्याने आग विझवताना मोठा वेळ लागला . आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मोठी मदत केली . मंडळ अधिकारी श्री बिडवे व तलाठी अरविंद चव्हाण यांनी पंचनामा केला . आमदार सुरेश वरपूडकर यांनी भेट देऊन नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा