कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांना वारंवार सांगून, तसेच नोटीसा बजावूनही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढले नसल्याने आज सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिक्षक विजय गायकवाड, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंढे, विनोद खैरालिया, राजेंद्र कंणगारे, रोहिदास शेंडगे, रोहिदास अहिरे यांच्यासह 23 कर्मचारी, 3 वाहनाच्या पथकाने शहरातील वडनेर रोडवरील लॅव्हिट मार्केट समोर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. यात 8 हातगाड्या जप्त करण्यात आल्या.