

नाशिक : पुढारी वृत्तसेवा :
पखाल रोडवर चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तंजिम इस्माईल शेख (३९, रा. पखालरोड) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने शनिवारी (दि.७) सकाळी नऊच्या सुमारास घरफोडी करून घरातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.