धुळे : वृध्दाच्या निर्घृण खून : पाेलिसांनी २४ तासांत आराेपीच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

धुळे : वृध्दाच्या निर्घृण खून : पाेलिसांनी २४ तासांत आराेपीच्‍या मुसक्‍या आवळल्‍या
Published on
Updated on

पिंपळनेर (जि.धुळे), पुढारी वृत्तसेवा :
वार्सा शिवारातील वृध्दाचा निर्घृण खून झाल्‍याचा प्रकार पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत घडला हाेता. पाेलिसांनी या प्रकरणातील आराेपीला २४ तासांमध्‍ये गजाआड केले आहे.

वार्सा गावाजवळील शेतात १७ फेब्रुवारी २०२२ रोजी वंशा पांडू सोनवणे ( वय ६० वर्ष रा.वार्सा ता.साक्री जि.धुळे) याचा अज्ञाताने खून केला हाेता. धारदार हत्याराने वार करुन वंशा साेनवणे यांचे डोके धडापासून वेगळे केले हाेते. आराेपीने मृतदेह शेतात फेकला हाेता. या घटनेमुळे पिंपळनेर शहरासह साक्री तालुक्यात खळबळ उडाली होती. पिंपळनेर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला हाेता.

वरिष्ठ पाेलिस अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी भेट दिली.  त्यानुसार पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांनी वेगवेगळे तपास पथक स्थापन केली. वार्सा परिसरात शोध घेत असतांना खबऱ्यांकडून माहिती घेतली.

विनायक नारायण कुवर ( रा.वार्सा ) याने गुन्हा केल्‍याची माहिती पाेलिसांना मिळाली.  त्‍याला वार्सा गावातून पाेलिसांनी ताब्यात घेतले. पिंपळनेर पोलीस ठाण्यास आणून त्‍याची कसून चाैकशी केली. वंशा सोनवणे याला नेहमी काहीना काही वस्तु चोरुन घेऊन जाण्याची सवय हाोती.

विनायक याने  एक आठवडयापूर्वी नवीन बैलांची जोडी खरेदी केली होती. ती खळयामध्ये बांधून ठेवली होती. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्‍याच्‍या सुमारास मवंशा हा आरोपीच्या खळयाकडे पायी जात असतांना दिसले. ताे बैल चोरण्यासाठीच आला असावा, असा संशय विनायक याला आला. या दोघांमध्ये शाब्दीक वाद होऊन त्यावेळी आरोपीताने  त्यांचे हातातील कुऱ्हाडीने मयत यांचे गळयावर जोरदार प्रहार केला. यानंतर धड व मान शरीरापासून वेगळी करुन मृतेहद बाजुला असलेल्या शेतामध्ये ओढत फेकुन दिल हाेता. पोलिसांनी पुरावा नसतानाही २४ तासाच्या आत तपास करुन आराेपीच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news