पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड करणार : संजय राऊत | पुढारी

पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड करणार : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड केला जाईल, त्याचीही पत्रकार परिषद शिवसेना भवन येथेच होईल, असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे करण्यात येत असलेला भ्रष्टाचार आम्ही उघडा पाडू, केंद्रीय तपास यंत्रणांचे जे दलाल आहेत ते म्हणजे किरीट सोमय्या यांचा पालघरला प्रोजेक्ट सुरू आहे. या प्रोजेक्टवर २६० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सोबतच कोटी कोटी रूपये यांच्याकडे येतातच कुठुन? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. तुमचा भ्रष्टाचार उघड केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे आमच्या कुंडल्या आहेत तशा आमच्याकडेही आहेत, असे शिवसेनेकूडन घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्र्यावर १५० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. आता हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा. असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. माझ स्पष्ट आव्हान आहे की केंद्रीय यंत्रणा आमच्या मागे लावा तुम्ही आमचं काहीही वाकडे करू शकणार नाही, रिश्तेमे हम तुम्हारे बाप लगते है, असा टोला संजय राऊत यांना मारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. नाईक कुटुंबीयांना तुम्हाला न्याय देता आला नाही. सीबीआयकडे केस दिली होती त्याचे पुढे काय झाले असा प्रश्नही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. नारायण राणेंकडून एखाद्या महिलेवर सतत लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप केले जात आहेत. हे आरोप करत तुम्ही एका स्त्रीचे चारित्र्यहनन करत आहात. भाजप नेत्यांकडून हे वारंवार महिल्यांचे चरित्रहनन करण्यात येत आहे, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

हेही वाचलतं का? 

Back to top button