नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे जोडे मारो आंदोलन

नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे जोडे मारो आंदोलन
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगरातर्फे रविवार कारंजा येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झालेले आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन आहे का? उद्धव ठाकरेंची भूमिका काय? असा सवाल केला. सावरकरांचा अपमान देशात व महाराष्ट्रात कदापि सहन केला जाणार नाही. त्यांचे देशप्रेम, त्याग, तपस्या देश विसरू शकत नाही, असे भाजयुमोचे शहराध्यक्ष अमित घुगे यांनी सांगितले.

जोडे मारो आंदोलनात देवदत्त जोशी, ॲड. अजिंक्य साने, सतीश शुक्ल, भक्तिचरणदास महाराज, सुजाता करजगीकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, विजय बनछोडे, हर्षद जाधव, प्रसाद धोपावकर, ऋषिकेश आहेर, डॉ. वैभव महाले, साक्षी दिंडोरकर, रश्मी कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news