

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही सरळ सेवेने शासकीय पदभरती करताना यापुढे टीसीएस, आयबीपीएस या खासगी कंपन्यांकडून स्पर्धा परीक्षा घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.
यापूर्वी शासकीय नोकरभरती करताना काही खासगी कंपन्यांकडून गैरप्रकार झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे नोकरभरती रद्द करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. यामुळे भरती प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी, शर्ती माहित-तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.