

नाशिक (कृषी) : प्रशांत दाते
बांबू ही वनस्पती उंच गवताचा प्रकार आहे. जगातील बांबू लागवडीचा विचार करायचा झाला, तर सुमारे 1,600 प्रजाती आढळतात. त्यापैकी आपल्याला भारत देशामध्ये 148 बांबू प्रजाती आढळतात. भारतामध्ये काश्मीर वगळता सर्वत्र सुमारे 14 मिलियन हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू उपलब्ध आहे. 50 टक्के होऊन जास्त बांबू ईशान्य भारतामध्ये आहे. त्याचबरोबर मध्य भारत आणि पश्चिम घाटामध्ये जास्त प्रमाणात पसरलेला आहे. महाराष्ट्रातील कोकण क्षेत्रात व इतर क्षेत्रातही आज बांबू लागवडीस फार मोठा वाव आहे.
पारंपरिक द्राक्ष, भाजीपाला, ऊस या पिकाला पर्याय म्हणून बांबू लागवड करता येते. शेतीत मान्सूनच्या लहरीपणामुळे वारंवार होणार्या नुकसानीपासून दूर राहण्यासाठी शाश्वत शेतीचा नवा पर्याय म्हणून बांबू पिकाची शेती करता येते. 12 महिने पडीक ते कायमस्वरूपी सुपीक जमीन तसेच कोरड्या ते अत्याधिक बाष्प असलेल्या जमिनीमध्ये बांबू वाढू शकतो. बांबू भारतीय वन कायदा 1927 नुसार भाग दोन परिच्छेद (7) बांबू हा शब्द वगळण्यात आला आहे. यापुढे भारतीय वन कायदा कोणत्याही नियम व अटी बांबू लागवड करणे, तोडणी करणे, त्याच्या वाहतुकीस परवाना लागू होणार नाही. शेतकर्याला आपल्या शेतामध्ये बांबू लागवड करण्यास कोणतेही बंधन राहिलेले नाही. भारतात आढळणार्या बांबूच्या विविध जातींचे गुणधर्म, महत्त्वाची वैशिष्ट्ये, उपयोग क्षमता व उपलब्धता या सर्वांचा अभ्यास करून भारत सरकारच्या 'बांबू मिशन', 'प्लॅनिंग कमिशन' संस्थेने व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त 17 बांबूची निवड केलेली आहे. महाराष्ट्रात नैसर्गिकरीत्या 'माणगा, मानवेल' आणि 'कळक' या बांबू प्रजाती आढळतात. त्याचबरोबर 'भोर मेस, चिवा, पिवळा बांबू' (शोभेसाठी) लागवडीसाठी अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर यांनी नऊ बांबू प्रजातीस प्राधान्य दिले आहे. जसे की, 'माणगा, मानवेल, कळक, टूलडा, अस्पर, बँडीसी, रुपाई, बाल्कोवा, न्यूटन' या नऊ बांबू प्रजातींना लागवडीसाठी प्राधान्य दिले आहे. 1,500 हून अधिक प्रकारच्या बांबूच्या वस्तू बांबूपासून 35 टक्के ऑक्सिजननिर्मिती होते. बांबू हा नगाप्रमाणे विकला जातो. बांबूपासून जगभरामध्ये 1,500 हून अधिक प्रकारच्या वस्तू जशा, हस्तकला, फर्निचर, विणकाम, दागिने, शिडी, पेपर इथेनॉल, सीएनजी गॅस, लोणचे इत्यादींची निर्माती केली जाते.