पुणे : मतदान करताना मुक्ता टिळक यांची उणीव भासली : शैलेश टिळक | पुढारी

पुणे : मतदान करताना मुक्ता टिळक यांची उणीव भासली : शैलेश टिळक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आलो आहे. मतदान करताना आम्हाला आमच्या कुटुंबीयांना मुक्ताची मोठी उणीव भासत आहे. त्या असत्या तर पोटनिवडणूक लागलीच नसती, मात्र त्यांच्या नसण्याने आम्हाला खूप दुःख होत आहे, अशी खंत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी व्यक्त केली.

कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शैलेश टिळक आपल्या कुटुंबीयांसह कन्या शाळा येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा कुणाल टिळक व अन्य होते. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी टिळक म्हणाले, मोठ्या मताधिक्याने भाजप यावेळी निवडून येणार आहे. सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Back to top button