Ahilyanagar Voter List Revision: नोटिसा बजावलेल्या मतदारांना दिलासा; सुनावणीऐवजी बीएलओ घरोघरी जाऊन पुरावे गोळा करणार

प्रारूप मतदारयादीवर ५५ हजार ५३५ दावे-हरकती; २ लाख ९२ हजार ४४९ मतदारांना बजावलेल्या नोटिसांनंतर आयोगाचा निर्णय
Voter List
Voter Listpudhari photo
Published on: 
Updated on: 

नगर: नोटिसा बजावलेल्‍या मतदारांची सुनावणी न घेता बीएलओंनीच या मतदारांच्‍या घरोघरी जाऊन मतदारांकडून आवश्‍यक ते पुरावे गोळा करण्‍याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. या निर्णयामुळे नोटिसा बजावलेल्‍या मतदारांना दिलासा मिळाला असून, बीएलओंचे काम वाढले आहे. आता ते मतदारांच्‍या घरोघरी फिरून पुरावे गोळा करू लागले आहेत.

Voter List
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत शिंदे-लंकेंची एन्ट्री; बिनविरोधाच्या चर्चेला धक्का?

दरम्‍यान, प्रसिद्ध झालेल्‍या प्रारूप मतदारयादीवर २९ सप्‍टेंबरपर्यंत ५५ हजार ५३५ दावे व हरकती प्राप्त झाल्‍या आहेत. यामध्‍ये २७ हजार १३३ नवीन मतदार नोंदणीसाठी दाखल झालेल्‍या अर्जांचा समावेश आहे. मतदारयादी पूर्णपणे बिनचूक आणि पारदर्शक करण्‍यासाठी भारत निवडणूक आयोगाच्‍या वतीने जिल्‍हाभरात मतदारयादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्‍यात आली. त्‍यासाठी बीएलओंमार्फत घरोघरी जाऊन मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेण्यात आले.

Voter List
Dhorjalgav Water Shortage: ऐन पावसाळ्यात ढोरजळगावला पाणीटंचाई; ३ ते ४ किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ

या प्रक्रियेत जवळपास ४ लाख २६ हजार मतदारांचे अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्‍यामुळे या अर्जांची वगळणी करून जिल्‍हा निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३३ लाख ८३ हजार १८७ मतदारसंख्‍या असलेली प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्‍ट रोजी प्रसिद्ध केली. या यादीवर ३० सप्‍टेंबरपर्यंत दावे व हरकती मागविण्‍यात आल्या आहेत. मात्र, आयोगाने या तारखेस मुदतवाढ दिली असून, इच्‍छुकांना आता नवीन मतदारनोंदणी तसेच वगळणी व दुरुस्‍तीसाठी १२ ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

Voter List
Ahilyanagar Drought: नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; खरीप पिकांचे पंचनामे सुरू, धरणसाठाही ८३ टक्क्यांवर

दरम्‍यान, प्रारूप मतदारयादीतील ज्‍या मतदारांची २००२ मधील मतदारयादीशी जुळणी झालेली नाही, तसेच नावांत विसंगती आढळून आली, अशा जिल्‍हाभरातील २ लाख ९२ हजार ४४९ मतदारांना सुनावणीसाठी उपस्‍थित राहण्‍याच्‍या नोटिसा बीएलओंमार्फत बजावण्‍यात आल्‍या होत्‍या. सुनावणी सुरू होत नाही, तोच निवडणूक आयोगाने या मतदारांची सुनावणी न घेण्‍याचा निर्णय घेत बीएलओंमार्फत संबंधित मतदारांचे आवश्‍यक ते पुरावे त्‍यांच्‍या घरी जाऊन गोळा करण्‍याचे आदेश जारी केले. दरम्‍यान, नगर शहर मतदारसंघातील काही मतदार नोटिसा मिळताच सुनावणीस उपस्‍थित राहिले होते.

Voter List
Dilip Khedkar Disproportionate Assets: पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या पाथर्डीतील घरावर एसीबीची झाडाझडती; १३ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

निवडणूक आयोगाच्‍या आदेशानुसार आता बीएलओ संबंधित मतदारांच्‍या घरी जाऊन मतदार होण्‍यासाठी आवश्‍यक ते पुरावे गोळा करीत आहे. उपलब्‍ध होणारे पुरावे सुनावणी अधिकार्‍यांना सादर केले जात आहेत. सुनावणीसाठी उपस्‍थित न राहण्‍याची सूट मिळाल्‍यामुळे नोटिसा बजावलेल्‍या मतदारांना आता दिलासा मिळाला आहे.

दुरुस्‍तीसाठी दाखल झाले तब्बल २२,५५७ अर्ज

२९ सप्‍टेंबरपर्यंत नवीन मतदारनोंदणी करण्‍यासाठी ६ नंबरचे २७ हजार १३३, वगळणीसाठी ५ हजार ८४५ तर मतदारयादीतील दुरुस्‍तीसाठी २२ हजार ५५७ अर्ज दाखल झाले आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news