Dhorjalgav Water Shortage: ऐन पावसाळ्यात ढोरजळगावला पाणीटंचाई; ३ ते ४ किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ

बोअरवेल, विहिरींनी गाठला तळ; टँकर सुरू करण्यासह बंधाऱ्यात कालव्याचे पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी
Dhorjalgav Water Shortage
Dhorjalgav Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

ढोरजळगाव: शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ढोरजळगाव- शे, मलकापूर, गरडवाडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून ऐन पावसाळ्यात महिलांना डोक्यावर, तसेच नागरिकांना मोटारसायकलवर तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

Dhorjalgav Water Shortage
Ahilyanagar Drought: नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; खरीप पिकांचे पंचनामे सुरू, धरणसाठाही ८३ टक्क्यांवर

त्यामुळे तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरा, तसेच कालव्याचे पाणी ढोरा नदीवरील बंधाऱ्यात सोडण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अंमलबजावणी न केल्यास आंदोलनाचा इशारा ढोरजळगाव परिसरातील नागरिकांनी दिला. शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे ७ हजार लोकसंख्या असलेला ढोरजळगाव परिसर हा ढोरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

Dhorjalgav Water Shortage
Dilip Khedkar Disproportionate Assets: पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या पाथर्डीतील घरावर एसीबीची झाडाझडती; १३ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

दरवर्षी पावसाळ्यात नदीला आलेल्या पाण्यामुळे ढोरा नदीवरील साखळी बंधारे भरतात. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटत होता. मात्र, यावर्षी अलनिनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असल्याने. ढोरा नदीला थेंबही आला नाही. त्यामुळे पाणी पातळी अत्यंत खालावली असून.

Dhorjalgav Water Shortage
Ahilyanagar Fake Currency Gang: ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष; बनावट नोटांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद

पाणीपुरवठा करणारे बोरवेल, विहीर, यांनी तळ गाठला असून दिवसभर सुमारे एक ते दीड तासच पंप चालत असून ते ही पाणी मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त असल्याने पिण्यासाठी व आरोग्यासाठी धोकादायक आहे. ग्रामपंचायत च्या वतीने ढोरजळगाव येथे तीन ठिकाणी आरो फिल्टर बसवले गेले असून गरडवाडी या ठिकाणी एक फिल्टर आहे.

Dhorjalgav Water Shortage
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत नवे राजकीय समीकरण; शिवसेना स्वबळावर लढणार!

मात्र, दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्चनही ते नादुरुस्त असल्याने परिसरातील नागरिकांना दोन किमी अंतरावर ढोरजळगाव ने येथील ग्रामपंचायतच्या आरो फिल्टरवरुन महिलांना डोक्यावर किंवा पाच किमी अंतरावरील निंबेनांदूर येथून ड्रमच्या साह्याने मोटरसायकल वरून पाणी आणावे लागते. ढोरजळगाव येथील काही तरुण व ग्रामस्थ हे टॅंकरने पाणी बाहेरून आणून आरो प्लांटच्या टाकीत सोडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news