Vivek Kolhe Lok Samvad: आ. विवेक कोल्हे यांच्या लोकसंवादाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले

हरिसन ब्रँचच्या पाण्यापासून निराधारांच्या रखडलेल्या मानधनापर्यंत प्रश्नांचा पाढा; प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना
Vivek Kolhe
Vivek KolhePudhari
Published on: 
Updated on: 

चांदेकसारे: आ. विवेक कोल्हे यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित लोकसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोपरगाव शहरासह मतदारसंघातील सार्वजनिक व वैयक्तिक समस्या जाणून घेण्यासाठी गुरुवारी (दि.५) या लोकसंवादाचे आयोजन केले होते. दुपारी १२ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता.

Vivek Kolhe
Shevgaon Paithan Road Accident: दिवाळीच्या खरेदीला निघालेल्या तीन युवकांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; खानापूरवर शोककळा

ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व प्रश्न मांडले. यामध्ये शेतकरी, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे अध्यक्ष व संचालक, महिला बचतगटांचे प्रतिनिधी, निराधार योजनेचे लाभार्थी आणि दिव्यांग नागरिकांचा समावेश होता. तहसीलदार महेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. या लोकसंवादात जेऊर कुंभारी येथील माजी संचालक मधुकर वक्ते यांनी हॕरिसन ब्रँच चारीच्या पाणीप्रश्नी आक्रमक भूमिका मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले.

Vivek Kolhe
Nagar Dam Water Storage: नगर जिल्ह्यातील धरणांत ६७ टक्के पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता वाढली

हरिसन ब्रँच चारीला पाणी मिळण्यास नेहमीच विलंब का होतो? इतर चाऱ्यांना वेळेवर पाणी सोडले जाते; शेतकऱ्यांनाच पाण्यासाठी वारंवार संघर्ष का करावा लागतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच जेऊर कुंभारी येथील आरपीआयचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला.

Vivek Kolhe
Radhakrishna Vikhe Patil Diwali: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत पालकमंत्र्यांची दिवाळी; विखे पाटलांनी घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद

मानधनाबाबत माहिती घेण्यासाठी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात. त्यामुळे लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत की नाहीत, तसेच अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या नेमक्या कोणत्या आहेत, याची माहिती संबंधितांना पत्राद्वारे अथवा दूरध्वनीवरून कळविण्यात यावी.नाहीत, अशी मागणी गायकवाड यांनी केली. या प्रश्नांची आ. विवेक कोल्हे यांनी तत्काळ दखल घेत तहसीलदार महेश सावंत यांना संबंधित प्रकरणांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात आ. कोल्हे यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

Vivek Kolhe
Gutkha Seizure In Ghargaon: नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याचा मोठा साठा जप्त; १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

विविध प्रश्नांवर वेधले लक्ष

लोकसंवादात दुष्काळी परिस्थिती, खरीप हंगामातील नुकसान, रब्बी हंगामासाठी पाणी, जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि वीजपुरवठा अशा विविध प्रश्नांवर नागरिकांनी आपली व्यथा मांडली. हरिसन ब्रँचसह गोदावरी डावा व उजव्या कालव्यांच्या आवर्तनाचा प्रश्नही यावेळी चर्चेत आला. याशिवाय निराधारांचे रखडलेले मानधन, महिलांची आर्थिक फसवणूक, शेतपंप चोरी, गावठाणासाठी जमीन, शिवरस्ते आणि विविध महसुली प्रश्नांवर नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.