Nagar Dam Water Storage: नगर जिल्ह्यातील धरणांत ६७ टक्के पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता वाढली

नऊ धरणांतील ३४ हजार ४६१ दलघफू पाण्याचे आठ महिन्यांसाठी नियोजन; भूजलपातळी तीन मीटरने खालावली, टँकरची शक्यता
Mula Dam
Mula DamPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्ह्यातील नऊ धरणांत ३४ हजार ४६१ दलघफू (६७ टक्‍के) पाणीसाठा शिल्‍लक आहे. आगामी आठ महिन्‍यांतील दुष्‍काळी परिस्‍थितीत पिण्‍याचे पाणी आणि रब्‍बी पिके तसेच चारा पिकांसाठी या पाण्‍याचे नियोजन करण्‍यात आले.एप्रिल-मे महिन्‍यांत पाण्‍याचे स्‍त्रोत कोरडेठाक झाल्‍यास टँकर भरण्‍यासाठी धरणांतील पाण्‍याचा वापर होण्‍याची शक्‍यता बळावली आहे.

Mula Dam
Radhakrishna Vikhe Patil Diwali: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत पालकमंत्र्यांची दिवाळी; विखे पाटलांनी घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद

सध्‍या भंडारदरा धरण सोडले तर मुळा, निळवंडे धरणांचा पाणीसाठी सरासरी ६५ टक्‍के इतकाच शिल्‍लक आहे. दरम्‍यान, मुळा व भंडारदरा धरणांतून प्रवरा व मुळा नदीपात्रांतील कोल्‍हापुरी बंधारे भरले गेले आहेत.

Mula Dam
Gutkha Seizure In Ghargaon: नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याचा मोठा साठा जप्त; १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

त्‍यामुळे या दोन्‍ही नदीकाठच्‍या जनतेला दोन महिने तरी दिलासा मिळाला आहे. यंदा धरणांच्‍या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्‍याने भंडारदरा, निळवंडे आढळा शंभर टक्‍के भरली गेली. मुळा धरणही ९५ टक्‍के भरलेगेले होते.

Mula Dam
Ahilyanagar Gram Panchayat Awards: अहिल्यानगरच्या ग्रामपंचायतींची बाजी! रेनवडी, लोणीसह पाच ग्रामपंचायतींना लाखोंची बक्षिसे

मात्र, लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिल्‍यामुळे या धरणांतील काही टीएमसी पाण्‍याचा वापर खरीप पिके वाचविण्‍यासाठी करण्‍यात आला. त्‍यामुळे मुळा व निळवंडे धरणांचा पाणीसाठा ६५ टक्‍क्‍यांवर आला आहे.

Mula Dam
Sweet Paan Drug Contamination: श्रीगोंद्यात गोड पानातून नशेचा संशयास्पद प्रकार? पान खाल्ल्यानंतर महिलेला चक्कर, मळमळ

५ नोव्‍हेंबरच्‍या अहवालानुसार घाटशीळ धरण कोरडेठाक असून, सीना धरण २७ टक्‍के, मांडओहळ १६, खैरी धरण १२ टक्‍के तर विसापूर धरणात ६४ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. पावसाअभावी भूजलपातळी तीन मीटरने खालावली आहे. त्‍यामुळे विहिरींनी तळ गाठला. त्‍यामुळे पाणीटंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या दिवसागणिक वाढू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.