Radhakrishna Vikhe Patil Diwali: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत पालकमंत्र्यांची दिवाळी; विखे पाटलांनी घेतला पिठलं-भाकरीचा आस्वाद

कळसपिंपरी येथे भवार कुटुंबासोबत साजरा केला दीपोत्सव; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचा दिला विश्वास
Radhakrishna Vikhe Patil Diwali
Radhakrishna Vikhe Patil DiwaliPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: दुष्काळाची दाहकता लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रूपयांची अग्रीम मदत बॅक खात्यात वर्ग केली. कर्जमाफी आणि थकीत वीजबीलही माफ केले. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्री या संकटात तुमच्या समवेत असल्याचा विश्वास देण्यासाठी आल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. मंत्री विखे पाटील यांनी पणती पेटवत भिवसेन भवार कुटुंबात ‘प्रकाशोत्सव’ साजरा केला. कुटुंबाला फराळाचे वाटप करतानाच जमिनीवर बसून पिठलं भाकरीचा अस्वादही घेतला. मंत्री विखे पाटलांच्या साधेपणाने भवार कुटुंबही भरावून गेले.

Radhakrishna Vikhe Patil Diwali
Gutkha Seizure In Ghargaon: नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याचा मोठा साठा जप्त; १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी कुटुंबांच्या घरातील दिवाळीचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. शेतातील उभ्या पिकांची चिंता, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक विवंचना अशा अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भिवसेन शंकर भवार यांच्या घरी दीपोत्सव साजरा केला. संकटा प्रसंगी सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्यासाठी आलो, असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली.

Radhakrishna Vikhe Patil Diwali
Ahilyanagar Gram Panchayat Awards: अहिल्यानगरच्या ग्रामपंचायतींची बाजी! रेनवडी, लोणीसह पाच ग्रामपंचायतींना लाखोंची बक्षिसे

कळसपिंपरी येथील ग्रमास्थांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधून त्यांचे प्रश्न समाजावून घेतले. लहान मुलांना मिठाई आणि फटक्याचे वाटप केले. उपस्थित महिला, युवकांची आस्थेने चौकशी केल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आ. मोनिका राजळे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil Diwali
Sweet Paan Drug Contamination: श्रीगोंद्यात गोड पानातून नशेचा संशयास्पद प्रकार? पान खाल्ल्यानंतर महिलेला चक्कर, मळमळ

भवार कुटूंबाने पारंपारीक पध्दतीने मंत्री विखे पाटील यांचे औक्षण केले. मंत्री विखे पाटील यांनी कपडे, मिठाई लाडक्या बहीणीला दिली. मुलांच्या शिक्षणा बरोबरच शेती व्यवस्यायाची माहितीही जाणून घेतली.यांनी सर्व सोपस्कार बाजूला ठेवत भवार कुटूंबियांनी केलेल्या पिठल भाकरीचं जेवण मंत्री विखे पाटील जमिनीवर बसून घेतले.

Radhakrishna Vikhe Patil Diwali
Vikhe Patil Ram Shinde Meeting: विखे-शिंदे यांच्यातील राजकीय वितुष्ट संपणार? दीड तासाच्या भेटीनंतर एकत्र येण्याचे संकेत

ग्रामस्थांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील यांनी गावातील पाणी समस्येची माहिती घेतली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारऱ्यांना तेथूनच दूरध्वनीवरून पाणी योजनेवर फिल्टर प्लॅन्ट बसविण्याच्या सूचना दिल्या.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या संकटाच्या काळात कोणीही स्वतःला एकटे समजू नये. दुष्काळ निवारणासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी केल्यास या संकटावर निश्चितपणे मात करता येईल.

राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.