Balasaheb Thorat Australia visit: बाळासाहेब थोरात यांचा ऑस्ट्रेलिया दौरा

या शिष्टमंडळामध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह शास्त्रज्ञांचा सहभाग आहे.
Balasaheb Thorat Australia visit
Balasaheb Thorat Australia visitPudhari
Published on
Updated on

संगमनेर: महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगासाठी महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) येथील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया या जागतिकस्तरावरील अग्रगण्य ऊस संशोधन संस्थेला भेट देणार आहे. दरम्यान, या शिष्टमंडळामध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह शास्त्रज्ञांचा सहभाग आहे.

Balasaheb Thorat Australia visit
‌Gas Cylinder Shortage: ‘सिलिंडर देता का..सिलिंडर..?‌’ अकोल्यात वधू-वर पित्यांची वणवण!

या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील ऊस शेतीसाठी नवे तंत्रज्ञान, सुधारित ऊस वाण, साखर उतारा वाढविण्याच्या पद्धती व आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

8 मेपर्यंत शिष्टमंडळ दौऱ्यावर गेले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऊस संशोधनासाठी आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे व शेतस्तरीय प्रयोग यांचा प्रभावी समन्वय केला जातो. संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची ही यंत्रणा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Balasaheb Thorat Australia visit
Parner Water Issue: पारनेर तालुक्यात टंचाईच्या झळा अधिक; 13 टँकर सुरू

दरम्यान, यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व शुगर रिसर्च (ऑस्ट्रेलिया) यांच्यात सामंजस्य करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा करार झाल्यास संयुक्त संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान देवाणघेवाण, शास्त्रज्ञांचे प्रशिक्षण व सुधारित ऊस वाणांच्या विकासासाठी मोठा मार्ग मोकळा होणार आहे.

‌‘जगभर साखर उद्योगात नवे तंत्रज्ञान आले आहे. नवीन संशोधन झाले आहे. त्यांचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया या संस्थेसोबत यासंदर्भात वाटाघाटी करणे, हा या दौऱ्याचा मुख्ये उद्देश आहे.

-बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news