Tofkhana Crime Rise: तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली; अवैध धंद्यांवर रेड

अहिल्यानगरच्या तोफखाना परिसरात गुन्हेगारी वाढ, अवैध धंदे आणि हाणामाऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीती
Police Action
Police ActionPudhari
Published on
Updated on

नगर: तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी आलेख झपाट्याने उंचावला असून, अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे क्रॉस रेडने सिद्ध झाले आहे. भाईगिरी, हाणामाऱ्या आणि उघड्यावर चालणाऱ्या अवैध व्यवसायांमुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपलाय का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Police Action
Andekar Gang Arrest: पुण्यातील आंदेकर टोळीच्या कोयता गँगला अहिल्यानगरमध्ये अटक; शस्त्रसाठा जप्त

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यापैकी तोफखाना हेवी पोलिस ठाणे म्हणून ओळखले जाते. पोलिस ठाणे सांभाळण्यासाठी खमक्या अधिकाऱ्यांची गरज असते. अनेक वेळा किरकोळ गोष्टीवरून शहरात दंगल, टोळीयुद्ध, खुनासारखे गुन्हे घडलेले आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्मार्ट पोलिसिंगला खूप महत्त्व आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सावेडी उपनगरासह सर्वत्र जुगार अड्डे, गुटखा व अवैध धंद्दे सुरू आहेत.

Police Action
Ahilyanagar MLC Election: अहिल्यानगर विधान परिषदेत पुन्हा रंगणार जगताप-ससाणे संघर्ष?

पोलिस ठाण्याची यंत्रणा फेल ठरत असल्याने पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांत तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत वैदूवाडी, पाईपलाईन रोड, बोल्हेगाव परिसरातील जुगार अड्डे व अवैध धंद्यांवर रेड केल्या आहेत. त्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुसरीकडे चोरीच्या गुन्ह्यातील उकल करण्यातही पोलिस अपयशी ठरले आहेत. दिवसा आणि रात्रीचे असे तीन महिन्यांत घरफोडीचे 39 गुन्हे दाखल आहेत. त्यातील फक्त 6 गुन्ह्यांची उकल झाली असून, 33 गुन्हे प्रलंबित आहेत. त्यामुळे पुन्हा तोफखाना पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकासह अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहे.

Police Action
Ahilyanagar ZP Fake Caste Certificate: बनावट जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात राहात्यातील शाखा अभियंत्यावर पदावनतीची कारवाई

भाईगिरीच्या घटनांमध्ये वाढ

नियम धाब्यावर बसवून अनेक हॉटेले आणि टपऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. पेट्रोलिंग करणारी पोलिस पथके रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्या हॉटेलवर गुन्हेगारी तरुणांचा राबता असतो. पाईपलाईन रोड, डी मार्ट परिसरात नुकत्याच काही गंभीर घटना घडल्याची उदाहरणे आहेत.

छेडछाडीच्या घटना वाढल्या

परिसरातील मुख्य रस्ते आणि शैक्षणिक संस्थांच्या आसपास टवाळखोरांचा सुळसुळाट झाला आहे. दुचाकीवरून सुसाट वेगाने जाणे, सायंकाळी महिला व विद्यार्थिनींची छेड काढणे अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुलींची छेड काढल्याचे नुकतेच दोन गुन्हे दाखल झाले. किरकोळ कारणावरून धारदार शस्त्रे काढून दहशत माजविण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Police Action
Shrirampur Firing Incident: ड्रोनच्या दहशतीत शेतकऱ्याचा इशारार्थ गोळीबार; चोरटे पसार, गावात भीतीचे वातावरण

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घाला वे

तोफखाना परिसरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, वाढत्या गुन्हेगारीला वेळीच वेसण न घातल्यास मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून, हद्दीतील अवैध धंदे समूळ नष्ट करावेत आणि रात्रीची गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी आता तरी ‌‘भाना‌’वर यावे

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर रेड करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना अवैध धंद्याची माहिती मिळते अन्‌‍ तोफखाना पोलिसांनाच का मिळत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे तोफखाना पोलिस पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्दे सुरू असल्याचे सिद्ध झाले. तेथील गुन्हे शोध पथकाने आता तरी ‌‘भाना‌’वर यावे, अशी चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news