Shrirampur Firing Incident: ड्रोनच्या दहशतीत शेतकऱ्याचा इशारार्थ गोळीबार; चोरटे पसार, गावात भीतीचे वातावरण

बेलापूर-उक्कलगाव परिसरात ड्रोनच्या घिरट्या व संशयित हालचालींमुळे खळबळ; सहा चोरटे दबा धरून बसल्याचा संशय, नागरिकांत भीतीचे सावट
Guns
GunsPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: बेलापूर-उक्कलगाव रोडवर वाबळे वस्तीवर सहा जण रात्री साडेआठ वाजताच चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसल्याचा संशय आल्यामुळे तेथील शेतकऱ्याने बंदुकीतील त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एक चोरटा थोडक्यात बचावला व सहाही चोरटे दोन मोटरसायकलींवरून पसार झाल्याचे सांगण्यात आले.

Guns
Ashok Kharat: समता पतसंस्था घोटाळ्यात भोंदू अशोक खरात न्यायालयीन कोठडीत; शिर्डी पोलिसांच्या ताब्याची तयारी

प्रवरा नदीकाठावर गेल्या चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात तीन ड्रोन घिरट्या घालत असल्याचे आढळून आले. त्यानंतर काही ठिकाणी अज्ञात व्यक्तीही फिरताना आढळल्या. दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी आंबे दवणगाव येथे अनोळखी व्यक्तींना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु ते मोटरसायकली सोडून पसार झाले.

Guns
Pathardi Police Station Protest: पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन; विठ्ठल खर्चन मृत्यूप्रकरणी गुन्ह्याची मागणी

नागरिकांनी त्या मोटरसायकली तोडल्या. त्यानंतर कालही केसापूर, आंबे दवणगाव, बेलापूर, सातभाई वसाहत या ठिकाणी रात्री ड्रोन घिरट्या घालत होते. पोलिसांनीही गस्त घातली; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच बेलापूर-उक्कलगाव रोडवर शिवाजी पाटील वाबळे यांच्या वस्तीलगत सहा जण दबा धरून बसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले.

Guns
Ahilyanagar Legislative Council Election: अहिल्यानगर विधान परिषद जागेवर भाजपचाच दावा; राम शिंदेंचे मोठे संकेत

त्यांनी ताबडतोब एकमेकांना फोन केले. त्यामुळे गावातील काही युवकही मदतीला धावले. त्या वेळी शिवाजी पाटील वाबळे यांनी आपल्या परवाना असलेल्या बंदुकीतील एक राऊंड फायर केला. त्यात एक संशयित चोरटा थोडक्यात बचावला व सहाही चोरटे आपल्या दोन मोटरसायकलींवरून पसार झाले.

Guns
Pathardi Bus Stand Fire Incident: पाथर्डी जुन्या बसस्थानक परिसरात भीषण आग; तीन ते चार टपऱ्या जळून खाक

प्रवरा काठावरील लोक चोरट्यांमुळे धास्तावलेले आहेत. ड्रोन फिरणे, अनोळखी इसम येणे, कधी चारचाकीतून तर कधी दुचाकीवरून येतात, त्यांच्याकडे हत्यारे असतात, बंदुकी असतात अशी नागरिकांत चर्चा आहे. त्यामुळे एकांतात वस्त्या असलेले नागरिक जीव मुठीत धरून रात्र काढत आहेच. आकाशात फिरणारे ड्रोन नेमके कशाचे आहेत, याची हाताळणी कोण करते, याबाबत पोलिसांनी शोध घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे व जे अनोळखी इसम फिरत आहेत त्यांचादेखील बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news