Andekar Gang Arrest: पुण्यातील आंदेकर टोळीच्या कोयता गँगला अहिल्यानगरमध्ये अटक; शस्त्रसाठा जप्त

अहिल्यानगरमध्ये दरोड्याच्या तयारीत असताना पाच आरोपी अटकेत; गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त
Arrested Jail
Arrested JailPudhari
Published on
Updated on

नगर: मीरावली पहाड पायथ्याशी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल, दहा जिवंत काडतुसांसह 2 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्णयात आला आहे.

Arrested Jail
Ahilyanagar MLC Election: अहिल्यानगर विधान परिषदेत पुन्हा रंगणार जगताप-ससाणे संघर्ष?

मुस्ताक इब्राहीम शेख (वय 22, रा. कोंढवा, आश्रमनगर, पुणे), विराट ऊर्फ विल्यम रवींद्र मेहंदळे (वय 26), समर्थ बाबासाहेब माडळकर (वय 19), समर्थ राजेंद्र दुधभाते (वय 18, तिघे रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे), आकाश संजय पवार (रा. ब्रह्मतळे, रा. भिंगार) अशी त्यांची नावे आहेत.

Arrested Jail
Ahilyanagar ZP Fake Caste Certificate: बनावट जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात राहात्यातील शाखा अभियंत्यावर पदावनतीची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना 26 मे रोजी अहिल्यानगरच्या मिलिट्री इंटेलिजेन्सकडून (साउथ कमांड) याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने पोलिस पथकाला रवाना केले. मीरावली पथकाने पहाडाच्या पायथ्याजवळ पाच संशयित तरुणांना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यातील आकाश पवार दुचाकीवर पळून गेला होता. नंतर शोध घेऊन अटक करण्यात आली.

Arrested Jail
Shrirampur Firing Incident: ड्रोनच्या दहशतीत शेतकऱ्याचा इशारार्थ गोळीबार; चोरटे पसार, गावात भीतीचे वातावरण

सर्व आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, कोयता, चाकू, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. आधीच्या चार आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, सुनील पवार, विष्णु भागवत, शाहीद शेख, प्रकाश मांडगे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Arrested Jail
Ashok Kharat: समता पतसंस्था घोटाळ्यात भोंदू अशोक खरात न्यायालयीन कोठडीत; शिर्डी पोलिसांच्या ताब्याची तयारी

पुण्यात गंभीर गुन्हे दाखल

पोलिसांनी पकडलेल्या टोळीतील आरोपी पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहेेत. आरोपी समर्थ मांडळकर, समर्थ दुधभाते यांच्याविरोधात कोंढवा, पुणे शहर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश पवारविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news