Ahilyanagar Drought Relief: दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन; साई संस्थानकडून ५ कोटींचे योगदान

सीएसआर कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा; पाणीटंचाई, जलसंधारण आणि पशुधनासाठी मदतीची गरज
Ahilyanagar Drought Relief
Ahilyanagar Drought ReliefPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्ह्यातील दुष्‍काळी उपाययोजनांना पूरक मदत म्हणून कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी देणाऱ्या कंपन्या, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, उद्योजक, फाउंडेशन, दानशूर व्यक्ती व इतर इच्छुक घटकांनी स्वेच्छेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Ahilyanagar Drought Relief
Kukadi Irrigation Water Release: शेतकऱ्यांना दिलासा! कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरपासून, घोडचे पाणी १० नोव्हेंबरला सुटणार

आगामी काळात पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलसंधारणाची कामे, नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, शेततळी व पाणीसाठवण संरचना निर्माण करणे, विहीर पुनर्भरण आणि जलपुनर्भरण यांसारख्या कामांसाठी सहकार्याची आवश्यकता आहे.

Ahilyanagar Drought Relief
Leopard Attack: नगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत! शाळकरी मुलासह ऊसतोड मजुरांवर हल्ला

तसेच पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्ध करून देणे, दुष्काळामुळे प्रभावित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य पुरविणे आणि आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देणे, अशा विविध बाबींमध्येही मदत अपेक्षित आहे. इच्छुक संस्था व कंपन्यांनी प्रस्तावित मदतीचे तपशील, अंदाजित निधी किंवा साहित्याचे प्रमाण, मदतीचे कार्यक्षेत्र आदींची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.

Ahilyanagar Drought Relief
Ahilyanagar Water Supply: अहिल्यानगरमध्ये नव्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या परवानग्यांना स्थगिती

सामाजिक कार्यासाठी प्रशासनाचे सहकार्य

जिल्ह्यात सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्या सीएसआर कंपन्या, स्वयंसेवी संस्था, फाउंडेशन आणि देणगीदारांना जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्‍याचे प्रशासनाने प्रसिध्‍दीपत्रकात म्‍हटले.

Ahilyanagar Drought Relief
Sugarcane Price Maharashtra: ऊसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; शेतकरी संघटना आक्रमक

साई संस्थानकडून ५ कोटींचे योगदान!

राज्यातील दुष्काळ निवारण कार्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात आले. या रकमेचा धनादेश श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने संस्थानच्या वतीने हे योगदान देण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थान भाविकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सेवाभावी कार्यातही योगदान देत असते. दुष्काळ निवारण कार्यासाठी दिलेले हे योगदान संस्थानच्या सेवाभावी कार्यपरंपरेचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news