Kukadi Irrigation Water Release: शेतकऱ्यांना दिलासा! कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरपासून, घोडचे पाणी १० नोव्हेंबरला सुटणार

पावसाअभावी रब्बी पिके संकटात; श्रीगोंदा, पारनेर, दौंड, शिरूरसह कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा
Kukadi Irrigation Water Release
Kukadi Irrigation Water ReleasePudhari
Published on: 
Updated on: 

श्रीगोंदा: यंदा पावसाने पाठ फिरवल्याने श्रीगोंदा तालुक्यासह घोड आणि कुकडी लाभक्षेत्रात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक निर्णय झाला आहे. शेतीसाठी रब्बी हंगामाचे कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरपासून, तर घोड धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन १० नोव्हेंबरपासून सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंहगळवारी ( दि. २७) राज्य शासनाने घेतला आहे.

Kukadi Irrigation Water Release
Leopard Attack: नगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत! शाळकरी मुलासह ऊसतोड मजुरांवर हल्ला

मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी नियोजनाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीतच या दोन्ही आवर्तनांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभागी झाले होते.

Kukadi Irrigation Water Release
Ahilyanagar Water Supply: अहिल्यानगरमध्ये नव्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या परवानग्यांना स्थगिती

प्रत्यक्ष बैठकीस माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार नारायण पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजीव चोपडे, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने श्रीगोंदा, पारनेर, शिरूर, दौंड या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या. विशेषतः डाळिंब, द्राक्षे, मोसंबी या फळबागा आणि ऊस, गहू, हरभरा या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.

Kukadi Irrigation Water Release
Sugarcane Price Maharashtra: ऊसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; शेतकरी संघटना आक्रमक

त्यामुळे घोड आणि कुकडीचे आवर्तन तात्काळ सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे म्हणाले, "आम्ही पुढील दोन दिवसांत कालवा-निहाय रोटेशनचे वेळापत्रक आणि पाण्याची उंची याचे नियोजन करून जाहीर करणार आहोत. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे." या निर्णयामुळे श्रीगोंदा, पारनेर, दौंड, शिरूर आणि कर्जत तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला फायदा होणार असून रब्बी हंगाम वाचण्याची आशा निर्माण झाली आहे. घोडवरील बंधारे भरल्यास पाणी पातळी वाढून विहिरींनाही फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Kukadi Irrigation Water Release
Ahilyanagar Crime: वाकोडीत पित्याच्या खुनप्रकरणी दोन्ही मुलांना अटक

वीजजोड तोडणे थांबवावे : आ. विक्रमसिंह पाचपुते

बैठकीत आमदार पाचपुते यांनी तालुक्यातील वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले, "सध्या धरणांमध्ये पाणी असले तरी भविष्यात चाराटंचाई मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यामुळे फक्त नगदी पिकांसाठीच नव्हे, तर चारा पिकांसाठी आणि गावांना पिण्यासाठीही प्राधान्याने नियोजन करणे गरजेचे आहे. घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घ्यावेत आणि गावतलावांवरील शेतकऱ्यांच्या मोटारींचे वीजजोड तोडण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो तात्काळ थांबवावा, अशी मागणी मी बैठकीत केली. त्यावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय होईल."

आ. दाते यांची मागणी

पारनेर : यापूर्वी कुकडीचे आवर्तन १२ नोव्हेंबरला सोडण्याचे नियोजन होते. मात्र, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आमदार काशिनाथ दाते यांनी आवर्तन लवकर सोडण्याची आग्रही मागणी केली होती. नव्या निर्णयानुसार ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हे आवर्तन पुढील ३५ दिवस चालणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news